आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासक्रम:आदल्या रात्री पाठवले नव्या अभ्यासक्रमानुसार पेपर घेण्याचे मेसेज ; विद्यार्थ्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधी विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर गैरसोय तर कधी अर्ध्या रात्री हॉलतिकिटाचे ऑनलाइन वाटप असे प्रकार करणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा एक नवा प्रताप समोर आला आहे. १६ जून रोजी वाणिज्य शाखेचा आंत्रप्रेनरशिप डेव्हलपमेंट या विषयाचा पेपर आहे. तो नव्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणार असल्याचा मेसेज बुधवारी रात्री शिक्षकांच्या ग्रुपवर टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे गुरुवारी होणाऱ्या पेपरमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या आठवड्यातच परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवण्यात आल्याने गोंधळ झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच २०२०-२१ च्या पदवी परीक्षा ऑनलाइन झाल्याने जुन्याच अभ्यासक्रमावर घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनीही जुन्याच अभ्यासक्रमावर आधारित पेपर दिला. परंतु २०२१-२२ मध्ये अभ्यासक्रम बदललेला असताना त्याची माहिती ना शिक्षकांना देण्यात आली ना विद्यार्थ्यांना. असे असताना १६ जून रोजी होणारा बी. कॉम. प्रथम वर्ष परीक्षेतील आंत्रप्रेनरशिप डेव्हलपमेंट विषयाचा पेपर नव्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, असे कळवले.

बातम्या आणखी आहेत...