आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MGM मध्ये 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन:बदलत्या शैक्षणिक धोरणासह शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर होणार चर्चा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधी मिशनच्या एमजीएम एज्युकेशन अनलिमिटेड या प्रशिक्षण विभागाने एमजीएम विद्यापीठाच्या सहकार्याने ‘लीड द एड-फ्युचर’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले असल्याची घोषणा एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ आणि परिषदेचे अध्यक्ष रणजीत कक्कड यांनी केली आहे.

येत्या 10 आणि 11 जानेवारी 2023 ला एमजीएम परिसरातील रुख्मिणी सभागृहात ही परिषद होणार असून बारावी पर्यंतच्या शिक्षणाचे विविध पैलू तसेच त्याचा उच्च शिक्षणाशी असणारा संबंध हा विषय या परिषदेचा केंद्रबिंदू असेल. बदलत्या शैक्षणिक धोरणासह शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर या परिषदेत चर्चा आणि मार्गदर्शन होणार आहे.

शिक्षणतज्ज्ञ, संस्था चालक, व्यवस्थापक, विश्वस्त, संचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक या परिषदेला उपस्थित राहून याचा लाभ घेऊ शकतात. परिषदेत, आयआयएम, अहमदाबाद इथल्या प्रोफेसर डॉ. निहारिका वोहरा यांचे 'भविष्याचा पुनर्विचार' या विषयावर बीज भाषण होणार आहे. आपल्या भाषणातून त्या शिक्षकांना नवीन युगातील वर्गखोल्यांमधील आव्हानांबद्दल अवगत करून मार्गदर्शन करतील.

परिषदेत सध्याची शिक्षण क्षेत्रातील आव्हानं, संधी आणि भविष्यातील शक्यता यावर प्रकाश टाकण्यात येणार असून शाळा संस्कृती, शाळा संकल्पना, शाळा वास्तुशास्त्र, शाळा व्यवस्थापन, बाल आरोग्य, विद्यार्थ्यांची मानसिकता, अभ्यासक्रम अशा विविध विषयांवर चर्चा, मार्गदर्शन आणि विचारमंथन होणार आहे.

याशिवाय परिषदेच्या निमित्ताने शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शालोपयोगी सर्वोत्तम उपक्रमांची माहिती स्पर्धात्मक स्वरूपात मागविण्यात आली असून सर्वोत्कृष्ट उपक्रमाला परिषदेत पुरस्कृत करण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्तम 100 उपक्रमांची विशेष पुस्तिका तयार केली जाणार आहे. मराठवाड्यात प्रथमच होत असलेल्या या परिषदेत सहभागी होण्यासाठी परिषदेबद्दलचा तपशील www.mgmeducationunlimited.com वर उपलब्ध असून अधिक माहिती साठी 9881010032/ 9923208810 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...