आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीक्षांत समारंभ:एमजीएमचा पहिला दीक्षांत समारंभ रविवारी

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील पहिलेच स्वयंअर्थसाहाय्यित खासगी विद्यापीठ असलेल्या एमजीएम विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ येत्या रविवारी (२७ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठातर्फे प्रख्यात साहित्यिक आणि विचारवंत अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर मानद वाङ‌्मय पंडित (डी. लिट.) पदवी देण्यात येईल.

या समारंभात अण्णा भाऊंचे कुटुंबीय ही पदवी स्वीकारतील. भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर समारंभाचे प्रमुख अतिथी असतील.

बातम्या आणखी आहेत...