आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:म्हाडा सभापतींचे कार्यालय बनले भाजप शहराध्यक्षांचे संपर्क कार्यालय, राजकीय वर्तुळात चर्चा

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने भाजप शहराध्यक्ष संजय केणेकरांना म्हाडा सभापतिपद पुन्हा मिळाले. महाविकास आघाडी सरकारने केवळ ४ महिने शिल्लक असल्यामुळे संबंधित आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले नाही. केणेकरांचे म्हाडा सभापतीचे कार्यालय आता भाजप शहराध्यक्षांचे संपर्क कार्यालय बनले आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी केणेकरांच्या उस्मानपुरा येथील कार्यालयात कमी जातात. परंतु, म्हाडा सभापती कार्यालयात रोज न चुकता जात आहेत. मनपा निवडणुकीच्या तयारीसाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी चांगले ठिकाण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे म्हाडा सभापती कार्यालयाचा केणेकर पुरेपूर उपयोग भाजपसाठी करून घेत आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून २०१९ मध्ये केणेकरांची म्हाडाच्या सभापतिपदी नियुक्ती केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांची नियुक्ती रद्द केली. केणेकरांनी या निर्णयास खंडपीठात आव्हान दिल्यानंतर खंडपीठाने केणेकरांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय रद्दबातल ठरवला. महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे केणेकरांनी सभापती म्हणून केलेली प्रत्येक मागणी केराच्या टोपलील टाकली जाणार आहे. याबाबत केणेकरांनाही चांगले माहिती आहे. त्यामुळे केणेकर मुंबई आणि पुणे येथील म्हाडाच्या बैठकीला जाणेही टाळतात. त्यांच्या कार्यालयातही कुणी नागरिक समस्या घेऊन जात नाही. तेथे केवळ भाजपचे कार्यकर्तेच बैठकांसाठी जातात. अनेक वरिष्ठ नेते केणेकरांना म्हाडाशी संबंधित कामे सांगत आहेत. परंतु, केणेकर त्यांना हो ला हो करत मोघम आश्वासने देऊन मोकळे होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...