आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 दिवसांत 6.4 अंशांची घसरण:आज सौम्य थंडी जाणवणार; आकाशात ढगही असतील

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवामानात वेगाने बदल होत आहेत. परिणामी तापमानात कमालीचे चढउतार झाले आहेत. १४ डिसेंबरला किमान तापमान १९ अंशांच्या पातळीवर गेले होते. त्या तुलनेत १९ डिसेंबरला ६.४ अंशांनी घसरण होऊन ते १२.४ अंश सेल्सियसवर नोंदले गेले. आकाशात अंशत: ढग जमा होणार असल्याने आजही सौम्य थंडी जाणवेल.

बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, हिंद महासागराच्या भूपृष्ठ पाण्याचे तापमान सरासरी दोन अंशांपर्यंत वाढले आहे. त्यामुळे चक्रवात वारे, कमी हवेचा दाब तयार होऊन सातत्याने अस्थिर वातावरण निर्माण होत आहे. परिणामी ढगांची गर्दी, आर्द्रतेत व तापमानात वाढ झाली होती. १५ डिसेंबरच्या मध्यरात्री पाऊस झाला. लगेच दुसऱ्या दिवसापासून तापमानात घसरण सुरू झाली. पाच दिवसांपूर्वी १९ अंशांवर गेलेले रात्रीचे तापमान १९ डिसेंबरपर्यंत सहा अंशांनी घसरून १२.४ अंशांवर आले आहे. मंगळवारी आकाशात ढगांची अंशत: गर्दी होऊन तापमानात १ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...