आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आंदोलन:परभणीसह हिंगोलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध बंद आंदोलन, दगडाला दुधाचा अभिषेक घालत दूध रस्त्यावर 

परभणी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुध दरवाढ आंदोलन त सहभागी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

परभणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध दराच्या प्रश्नावर मंगळवारी दूध बंद आंदोलन करण्यात आले. शासकीय दुध डेअरी जवळ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडाला दुधाचा अभिषेक करीत दूध रस्त्यावर ओतले. दुध दरवाढ आंदोलन त सहभागी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गायीच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी पहाटेपासूनच आंदोलन सुरू केले आहे. राज्यभरात ही आंदोलने केली जात आहे. दरम्यान परभणीमध्येही असेच आंदोलन शेतकऱ्यांकडून करण्यात आले. 

शेतकऱ्यांनी दगडाला दूधाचा अभिषेक घालून दूध रस्त्यावर ओतले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटिंग, संतोष पोते, रामप्रसाद गमे, ज्ञानेशवर भालेराव, हनुमान भरोशे, पप्पू कत्ते, निलेश साबळे, पांडुरंग काळे, एकनाथ भालेराव, विलास शिंदे, अंबादास ढेम्बरे, अंगद मोरे, कृष्णा खुळे, गजानन आहेर, ज्ञानेश्वर जावळे यांची उपस्थिती होती. 

दरम्यान हिंगोलीमध्ये दूधाच्या टँकरला आगीत ढकलण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी टायरवर पेट्रोल टाकून आग लावली. तर परभणीच्या औंढा भागात ट्रक थांबवून आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.