आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादैत्यगुरू शुक्राचार्य यांची तपोभूमी अशी पौराणिक ओळख शिर्डीची आहे. येथील गोदावरीच्या दक्षिण तीरावर दीडशे वर्षांपूर्वी जगाला शांती, समता, सर्वधर्मसमभाव, श्रद्धा-सबुरी व सबका मालिक एक अशी शिकवण देणाऱ्या साईबाबांचे शिर्डीत आगमन झाले. साईबाबांच्या पन्नास वर्षांच्या वास्तव्यानंतर त्यांनी द्वारकामाईत घेतलेला अखेरचा श्वास तेथील वायुमंडळात विलीन झाला. येथील बुटीवाड्यातील समाधीच्या चौथऱ्यात साईबाबांचा पवित्र देह विसावला आहे. भाविकांच्या हाकेला धावणारे साईबाबा आजही जगभरातील करोडो भक्तांना शिर्डीला ज्याचे लागतील पाय त्याला सुख-समृध्दीची व दु:खाचा नाश करण्याची ग्वाही देत आहेत.साईबाबांच्या हयातीत प्रचार-प्रसाराची अगदी तुटपुंजी साधने असतानाही देशाच्या अनेक प्रांतातून भाविक शिर्डीसारख्या खेडेगावात येत होते. ‘माझा माणूस जगात कोठेही असला तरी मी त्याला ओढून आणेल. माझ्या समाधीनंतर शिर्डीत मुंग्यासारखी गर्दी होईल,’ हे त्यांचे वाक्य आज सत्यात उतरलेले दिसते.
साईबाबांचे सन १८५८ च्या सुमारास शिर्डीत आगमन झाले. शिर्डी येथील प्रदीर्घ वास्तव्यात त्यांनी अनेक भक्तांचे आजार स्वत: शुश्रूषा करून बरे केले. त्यांनी स्वहस्ते प्रज्वलित केलेल्या व आजमितीसही अखंडपणे प्रज्वलित असलेल्या धुणीतील उदीच्या साहाय्याने अनेक भक्तांचे असाध्य रोग बरे होतात, अशी श्रद्धा आहे. आजही संपूर्ण जगातून सर्व धर्माचे लोक साई समाधीच्या दर्शनास येतात. म्हणून या श्रध्दास्थानास, साईंच्या समाधी मंदिरास आज एकात्मिक व वैश्विक मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.कसे जाल - शिर्डीत जाण्यासाठी देशाच्या विविध भागातून रेल्वे थेट उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणाहून तसेच गोवा, मध्य प्रदेश, तेलंगण, हैदराबाद, राजस्थान आदी ठिकाणांहून बससेवा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.