आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओवेसी हे स्वत:ला औरंगजेब समजतात:मृत्यूनंतर माझा दफनविधी औरंगाबादेत करा ओवेसी विधान; ओवेसींचे खरे दात समोर आले शिवसेनेची टीका

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मृत्यूनंतर माझा दफनविधी औरंगाबादेतच करा,’ असा पुनरुच्चार एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असद्दुद्दीन ओवेसी यांनी नुकताच केला आहे. मुस्लिम धर्मात औरंगाबादजवळील खुलताबाद हे शहर पवित्र मानले जाते. त्यामुळे मोगल सम्राट औरंगजेबाची कबरदेखील खुलताबादेतच आहे. याच संदर्भातून ओवेसींनी हे विधान केले. मात्र शिवसेनेने त्यावर टीका केली.

आमदार अंबादास दानवे म्हणाले, ‘ओवेसी हे स्वत:ला औरंगजेब समजतात. ज्याप्रमाणे औरंगजेबाची कारकीर्द धर्मांध होती. त्याचप्रमाणे एमआयएमचे काम आहे. ओवेसी यांचे खरे दात समोर आले आहेत.’

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी मात्र शिवसेनेला प्रत्त्युत्तर दिले. ‘दानवे यांच्या बडबडीकडे मी लक्ष देत नाही. आमचे पक्षाध्यक्ष ओवेसी पहिल्यांदाच असे म्हणाले नाहीत, यापूर्वीही त्यांनी हैदराबाद व इतर ठिकाणच्या भाषणांमध्ये असे जाहीर विधान केले होते, असे इम्तियाज यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...