आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांविरोधात MIM चाही एल्गार:उद्या कोश्यारींविरोधात आंदोलन;17 डिसेंबरच्या 'मविआ'च्या मोर्चात सहभागी होणार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मुंबईत 17 डिसेंबरला मविआतर्फे मुंबईत मोर्चा​ काढण्यात येणार आहे. या मोर्चात एमआयएम पक्षही सहभागी होणार असून उद्या औरंगाबादेत एमआयएमतर्फे राज्यपालांविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज दिली.

एमआयएम समर्थन करणार

इम्तियाज जलील म्हणाले, भाजप, काॅंग्रेस असो की, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी असो ज्यांना छत्रपती शिवरायांबद्दल आदर असेल तर सर्वांनी एकमताने निर्णय घ्या. राज्यपालांना महाराष्ट्रातून बाहेर पाठवा. एमआयएम पक्ष पूर्ण ताकदीने समर्थन करणार आहे.

मविआचा मोर्चा

उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांना महाराष्ट्राचा अपमान सहन होत नाही, त्यांनी सर्वांनी एकत्र यावे, आम्ही मविआतर्फे आझाद मैदानात 17 तारखेला राज्यपालांच्या आणि सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार आहोत.

म्हणून ऐकतोय..

मविआच्या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर काल जोरदार हल्लाबोल केला.​​​​​​राज्यपाल आहेत म्हणून त्याचे ऐकावे लागते. ते महाराष्ट्राच्या अस्मितेला छिन्न विछिन्न करत आहेत. म्हणून राज्यपाल शिवरायांबद्दल, महात्मा फुलेंबद्दल वादग्रस्त बोलत आहेत. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे.

नेमके काय म्हणाले ठाकरे?

काल संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, गुजरातमध्ये निवडणुका होत्या म्हणून येथील प्रकल्प गुजरातमध्ये नेले. आता थोड्याच दिवसात कर्नाटकांच्या निवडणुकासाठी महाराष्ट्राची गावे तोडणार का असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहेत हे कळणार कधी, कर्नाटकात काही मंत्री जाणार होते. त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा देताच दौरा रद्द करण्यात आला, इतका नेभळट महाराष्ट्र कधीही कुणीही पाहिला नाही, हे नेभळत सरकार म्हणजे महाराष्ट्र नव्हे हे सांगण्याची वेळ आली आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

अजित पवारांचाही हल्लाबोल

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, आमच्यासोबत सर्व घटक पक्ष 17 तारखेच्या मोर्चात सहभागी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सुरू असलेले वक्तव्यामुळे राज्यपालांना हटविण्यात यावे, मात्र मोर्चाच्या आधी राज्यपालांना हटवले तरी मोर्चा निघणार.

बातम्या आणखी आहेत...