आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना प्रकरणावर प्रतिक्रिया:शिवसेनेशी राजकीय मतभेद असले तरी उद्धव ठाकरे माझेही मुख्यमंत्री, त्यांचा अनादर स्वीकारला जाणार नाही, कंगनाने वक्तव्याचा विचार करावा - इम्तियाज जलील

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेली उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली आणि एक वादंग निर्माण झाले. आता राज्यातील राजकारणाला एक वेगळेच वळण लागले आहे. शिवसेना आणि कंगनामध्ये चांगलाच वाद सुरू आहे. दरम्यान आता या वादावर औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही कंगनाला सुनावले आहे.

बुधवारी कंगना मुंबईत आली यापूर्वीच बीएमसीकडून तिच्या कार्यालयाची अनधिकृत असल्याचे सांगत तोडफोड करण्यात आली. यानंतर कंगनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेली उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. या टीकेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. यावरुन आता शिवसेनेशी कधीही न पटणारे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही कंगनाला चांगलेच सुनावले आहे.

इम्तियाज जलील यांनी याविषयावर एक ट्विट केले. ते म्हणाले की, 'आमचे शिवसेनेसोबत राजकीय मतभेद असू शकतात. पण उद्धव ठाकरे हे माझेही मुख्यमंत्री आहेत. यामुळे त्यांचा अनादर तेही टॉम, डिक आणि हॅरी कुणाकडूनही हे स्वीकारले जाणारे नाही. कंगनाने तिच्या भाषेचा आणि वक्तव्याचा विचार करायला हवा,' असं ते म्हणाले आहेत.

काय म्हणाली होती कंगना?
अभिनेत्री कंगना रनोट बुधवारी संपूर्ण सुरक्षेत तिच्या घरी परतली. यानंतर बीएमसीने तिच्या कार्यालयाची केलेली तोडफोड पाहून तिने एक व्हिडिओ ट्विट केला होता. घरी पोहोचताच कंगनाने “हा लोकशाहीचा मृत्यू,” असे म्हणत एक व्हिडिओ पोस्ट केला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत आव्हान दिले आहे. ती म्हणाली की, आज माझे घर तुटले आहे, उद्या तुमचा अहंकार मोडेल. जय महाराष्ट्र.

कंगना म्हणाली, ''उद्धव ठाकरे, तुम्हाला काय वाटते, चित्रपट माफियांसोबत मिळून तुम्ही माझे घर तोडून मोठा सूड उगवला. तुम्ही खूप मोठे उपकार केले आहे. काश्मिरी पंडितांसोबत काय घडले असेल, हे मला माहित होते. मात्र आज मला याची जाणीव झाली आहे. आज मी तुम्हाला एक वचन देते की, मी केवळ अयोध्येवरच नाही तर काश्मीरवरही एक चित्रपट बनवेल. मी माझ्या देशातील लोकांना जागे करेन. ठाकरे जे क्रौर्य आणि दहशत माझ्याबाबतीत घडली आहे, त्याला नक्कीच अर्थ आहे. जय हिंद. जय भारत'', अशा शब्दांत कंगनाने आपला संताप व्यक्त केला होता.