आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MIM मुख्यमंत्री शिंदेंना दाखवणार काळे झेंडे:अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्धवस्त झालेला असताना नामांतराचे राजकारण काय करताय?

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजी महाराज नगर करण्यात आले आहे. या निर्णयाला आमचा विरोध आहे आणि पुढेही राहणार. त्यामुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत आम्ही काळे झेंडे दाखवून करणार आहोत. अशी संतप्त प्रतिक्रिया औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याकडे मुख्यमंत्री व राज्य सरकारचे लक्ष नाही. केवळ आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद शहराचे नामांतर केले आहे. त्याला आमचा विरोध आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा आम्ही सन्मान करतो. परंतु त्यांच्या नावावरील राजकारण आम्ही चालू देणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत आम्ही काळे झेंडे दाखवून करणार आहोत. अशी भूमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली आहे.

कृषिमंत्री राज्याला देऊ शकत नाही

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याला खासदार इम्तियाज जलील यांनी कडाडून विरोध केला आहे. ते म्हणाले, दोन मंत्र्यांचे हे सरकार आहे. एक कृषिमंत्री ते राज्याला देऊ शकत नाही. आज अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी उद्धवस्त झाला आहे. त्याला मदत करण्याऐवजी केवळ नामांतराचे मुद्दे घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारण करत आहेत.

ऐतिहासिक शहराचे नाव बदलू देणार नाही

शहरात माझ्यासह नामांतर विरोधी सर्वपक्षीय कृती समितीच्या सदस्यांसह आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचे शहरात स्वागत करणार आहोत. अशी ठाम भूमिका खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा आदर करतो. पुण्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे आमचा त्याला कोणताही विरोध नाही. परंतु ऐतिहासिक शहराचे नाव आम्ही बदलू देणार नाही त्यासाठी आम्ही लढा देऊ. असेही ते म्हणाले.

कमजोर लोकांना कुंड्यांची गरज

बंडखोर आमदार व भाजप अपंग आहेत. त्यामुळे ते एकमेकांसाठी कुबड्या बनत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोण कोणासोबत आघाडी करेल तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. दोन पक्ष काय चार-पाच पक्ष एकत्रित या आम्ही त्यांचा सामना करण्यासाठी तयार आहोत. असे म्हणत आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजप व शिंदे गट आघाडीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला इम्तियाज जलील यांनी खोचक प्रतिक्रिया दिली.

बातम्या आणखी आहेत...