आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:एमआयएमची पहिल्या पसंतीची दोन्ही मते शिवसेनेलाच, दुसरी पसंती काँग्रेसला; आता विकास निधीचा शब्द पाळा

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना शब्द दिला होता. तो शब्द पाळत आमच्या दोन आमदारांनी पहिल्या पसंतीची मते शिवसेनेचे संजय पवार आणि दुसऱ्या पसंतीची मते काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना दिली, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी (१० जून) स्पष्ट केले. एमआयएमची पहिल्या पसंतीची मते काँग्रेसला गेली, असे कुणी सांगत असेल तर काँग्रेसच्या हक्काची दोन मते कुठे गेली, याचा शोध महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घ्यावा, असेही ते म्हणाले. आम्ही आमचा शब्द पाळल्याने महाविकास आघाडीही विकास निधीचा शब्द पाळेल, अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी एमआयएमच्या दोन मतांसाठी शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने इम्तियाज यांची मुंबईत भेट घेतली. दोन्ही पक्षांच्या भूमिका एकमेकांच्या कट्टर विरोधात असल्याने या भेटीचा काही उपयोग होणार नाही, असे म्हटले जात होते. मात्र, विकास निधीच्या मोबदल्यात शिवसेनेला मतदान करण्याची तयारी एमआयएमने केली. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते, असे लक्षात आल्यावर इम्तियाज यांनी ‘आमची मते महाविकास आघाडीतील काँग्रेसला म्हणजे इम्रान प्रतापगढींना’ असे ट्वीटही केले. प्रत्यक्षात इम्रान यांना काँग्रेसच्या हक्काची ४४ मते पडल्याचे समोर आले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, एमआयएमने काँग्रेसलाच मतदान केले. यावर इम्तियाज म्हणाले की, आम्ही आमच्या दोन्ही मतांची पहिली पसंती शिवसेनेचे संजय पवार, दुसरी पसंती इम्रान यांना दिली. तरीही आमची पहिली पसंती इम्रान यांनाच मिळाली, असे कुणी सांगत असेल तर मग काँग्रेसच्या हक्काची दोन मते नेमकी कुठे गेली, याचा शोध नेत्यांनी घ्यावा. एमआयएमच्या दोन्ही आमदारांच्या मतदारसंघात विकास निधी मिळावा, यासाठी आम्ही सौदेबाजी केली. आम्ही शब्द पाळला. आता संजय पवार यांचा पराभव झाला असला तरी महाविकास आघाडीने शब्द पाळावा, अशी अपेक्षा आहे.

त्यांचे पहिल्या पसंतीचे मत काँग्रेसच्या उमेदवारालाच खासदार इम्तियाज काहीही सांगत असले तरी त्यांची पहिल्या पसंतीची मते काँग्रेसलाच गेली आहेत. त्यांनी शिवसेनेला मतदान केलेलेच नाही. काँग्रेसच्या हक्काची दोन मते कुठे गेली आणि काय आकडेमोड झाली, हे संजय राऊत यांनाच माहीत आहे. तुम्ही त्यांना विचारा. - चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते

बातम्या आणखी आहेत...