आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:अखंड उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू करणार, खासदार इम्तियाज यांना मंत्री गडकरींचे आश्वासन

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बहुचर्चित जालना रोडवरील अखंड उड्डाणपुलाच्या डीपीआरला गती देण्याची मागणी खासदार इम्तियाज जलाल यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. तसेच खासदारांनी ४ एप्रिल रोजी गडकरींची भेट घेऊन जालना रोडवरील अखंड उड्डाणपूल, पैठण रस्ता आणि शिर्डीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाबाबत चर्चा केली असता, गडकरींनी जालना रोडवरील उड्डाणपुलाच्या डीपीआरच्या कामाला गती देऊन तत्काळ अखंड उड्डाणपुलाचे काम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले. खासदारांनी एनएचएआय विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त बैठका घेऊन योग्य त्या सूचना केल्या होत्या. अखंड उड्डाणपूल व्हावे, म्हणून राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य, मदत करण्याची तयारी दर्शवली होती. ४ एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान शिर्डीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबतचा मुद्दा उपस्थित करून पैठण रस्त्यासह औरंगाबाद जिल्ह्यात प्रलंबित व प्रस्तावित इतर प्रकल्पांविषयी चर्चा केली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निकृष्ट रस्त्यांची चौकशी करावी, अनेक वर्षांपासून रखडलेली रस्त्यांची कामे पूर्ण करावी, अशी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...