आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहीनबाग:अलीकडे जातीयवादी वळण देण्याची फॅशन, शाहीनबाग प्रकरणात मंत्री मुख्तार नक्वींचे वक्तव्य

शाहीनबाग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुन्हेगारी कृत्य किंवा बेकायदा कामांना जातीयवादी वळण देण्याची आता फॅशन निघाली आहे, असे अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे. दिल्लीच्या शाहीन बाग येथे पाडकामाला विरोध करण्यासाठी शेकडाे लोकांनी मंगळवारी येथे स्थानिक महापालिका प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. त्यावर नक्वी यांनी ही प्रतिक्रिया दिली.

भाजप पालिकेच्या आडून शाहीन बागमधील वातावरण बिघडवू पाहत आहे. त्यातून दोन समुदायांत तणाव निर्माण होत आहे, असा आरोप आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांनी साेमवारी केला. एवढेच नव्हे तर खान आणि काँग्रेसचे काही नेते घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनीही पाडकामाच्या कारवाईला कडाडून विरोध करताना धरणे आंदोलन केले होते. त्याविषयी विचारले असता नक्वी म्हणाले, आप आणि काँग्रेस यांनी अशा कारवाईच्या विरोधात एकत्र येणे दुर्दैवी आहे. बेकायदा कृतीच्या विरोधातील कायदेशीर कारवाईला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. त्याला सांप्रदायिक रंग देण्याचा प्रयत्न होऊ नये. परंतु काही राजकीय पक्ष अशा घटनांना रंग देऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम करत आहेत. कोणी गुन्हा करत असल्यास घटनेनुसार कारवाई व्हावी.

बातम्या आणखी आहेत...