आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजप सरकारला 8 वर्षे पूर्ण झाले आहेत. या खास निमित्ताने संघटनात्मक कार्याचा भाग म्हणून केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री मंत्री रावसाहेब दानवे हे कन्याकुमारी जिल्हा दौऱ्यावर आहेत.
यशोगाथा सांगितली
महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमात राहसाहेब दानवे उपस्थित होते. दिव्य मराठी ने त्यांच्याशी संपर्क साधून विशेष मुलाखत घेतली. यानिमित्त त्यांनी दिव्यमराठी सोबत केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या यशस्वितेची गाथा सांगितली.
लाभार्थ्यांशी संवाद
कन्याकुमारी येथील मार्तंडम येथे कार्यक्रमाचा पहिला भाग म्हणून केंद्रातील सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दानवे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना, जनधन योजना, गरीब कल्याण अन्न योजना, किसान सम्मान निधी यासह अनेक योजनामुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवनात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. मागील 8 वर्षांमध्ये, आयुष्मान भारत ते आत्मनिर्भर भारतापर्यंत, देशाच्या 'संपूर्ण विकासाची' संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवली गेली आहे.
गरिबांची सेवा हाच संकल्प
कन्याकुमारी जिह्यातील शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रमात बोलतांना मंत्री दानवे म्हणाले की, गरिबांची सेवा करणे, लोकांची सुरक्षा सुनिश्चित करणे, शेतकऱ्यांचे कल्याण करणे आणि लोकांचे जीवन सुलभ करणे हा आमचा संकल्प आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभांचा 11 वा हप्ता देखील जारी केला आहे. यामुळे सुमारे 21 हजार कोटींची रक्कम 10 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांना हस्तांतरित करण्यात आली आहे. डिसेंबर 2018 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना 6000 रुपये मिळतीत.
मोफत गॅस कनेक्शन
दानवे म्हणाले की, पीएम उज्ज्वला योजना मे 2016 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे देशातील एपीएल, बीपीएल आणि शिधापत्रिकाधारक महिलांना स्वयंपाकाचा गॅस पुरवला जात आहे. ज्या अंतर्गत देशातील 9 कोटींहून अधिक माता-भगिनींना मोफत गॅस कनेक्शन मिळाले आहेत. 'बेटी पढाओ बेटी बचाओ' अंतर्गत 2015 मध्ये सुरू झालेली सुकन्या समृद्धी योजना आज देशात सुरू झाली. जे पालकांना त्यांच्या मुलीचे भविष्य सुधारण्याची संधी देते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.