आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधिक्षकांकडे तक्रार:राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मंत्री संदिपान भुमरेंची शिवीगाळ

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकीय मतभेद असल्याने विरोधात पोस्ट केल्या, महाविकास आघाडी असल्याने आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान गर्दी जमवल्याच्या रागातून पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी मला अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिवाजी चावरे यांनी याप्रकरणी पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्याकडे तक्रार केली आहे. न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष राहिलेले २६ वर्षीय युवराज हे सध्या पैठण तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. पोलिस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीतील आरोपांनुसार, १० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून २१ वाजता त्यांना त्यांच्या व्हाॅट्सअॅप कॉलवर भुमरे यांनी संपर्क साधला. ‘तुला जास्त माज आला का, तुला जास्त झाले का, पाचोडला आल्यावर तुला दाखवतो, नसता तुझ्या घरी पोरं पाठवून मारीन, आमच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट का करतो, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच कॉलच्या शेवटी मी पालकमंत्री असून माझे कोणी काहीही करू शकत नाही, तुला सोडणार नाही,’ असे म्हणून खोटे गुन्हे दाखल करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप युवराज यांनी केला आहे. पाचोड पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता तेथे अर्जच स्वीकारला नाही. त्यामुळे मी अधीक्षकांकडे अर्ज केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, धमकीमुळे माझे कुटुंब घाबरले असून मला किंवा कुटुंबातील सदस्यांना काहीही झाल्यास त्यास सर्वस्वी भुमरे जबाबदार असतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...