आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री संदीपान भुमरेंचा ठाकरेंवर हल्लाबोल:म्हणाले - शिंदे कामाचे, लोकप्रिय असल्याने त्यांच्या सत्कार; उद्धव ठाकरेंनी काय केले?

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

12 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार पैठणमध्ये करण्यात येणार आहे. मात्र या सत्काराच्या निमित्ताने रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ठाकरेंनी काम केले नाही

माणुस कोणाचा सत्कार कधी करतो. तो जर लोकप्रिय असेल आणि कामाचा असेल तरच सत्कार करतो. त्यांनी कधी कामच केले नाही. तुम्हाला कधी भेटले आम्हाला त्यांना नाव ठेवायचे नाही. त्यांनी काय केले तुम्हाला माहित आहे. त्यानी काम केले असते तर ही क्रांती झालीच नसती असे सांगत उद्धव ठाकरेचे नाव न घेता त्यांनी ठाकरेवर जोरदार टिका केली आहे. ते औरंगाबामध्ये शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

12 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैठणमध्ये येणार आहे. या वेळी शिंदे यांची पैठणमध्ये भव्य सभा देखील होणार आहे. पैठणच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी संदीपान भुमरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी सहकारमंत्री अतुल सावे आमदार संजय शिरसाठ, आमदार रमेश बोरनारे यांची उपस्थिती होती. तर पत्रकार परिषद संपल्यानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तार देखील या कार्यक्रमात हजर झाले.

दोन हजार कोटीचा निधी दिला

भुमरे म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी गेल्या एका महिन्यात पैठण विधानसभा मतदारसंघासाठी दोन हजार कोटीचा निधी दिला आहे. त्यामध्ये ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना 890 कोटीची सुप्रमा मंजुरी केली आहे.या योजनेसाठी मी गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न करत होतो. मात्र निधी मिळाला नव्हता. मात्र एकनाथ शिंदे यांनी त्याला मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पैठण तालुक्यासाठी 388 कोटी वॉटरग्रीड योजनेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे पैठण तालुक्यातल्या लोकांना जायकवाडी धरणातून गावातल्या लोकांना पाणी मिळणार आहे.तसेच

300 कोटी ग्रामीण भागातल्या रस्त्यासाठी मंजुर केले आहेत. पैठण शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी 40 कोटी मंजुर झाले आहे. पैठण विधानसभा क्षेत्रात 2000 कोटीचा निधी मंजुर झालेला आहे. त्यामुळेच त्यांचा सत्कार करायचा आहे.

सभेबाबत स्पर्धा नाही

अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्यामुळे सत्तारानंतर तुमचे शक्तीप्रदर्शन आहे, का याबाबत विचारले असता आमचे शक्तीप्रदर्शन नाही. मुख्यमंत्री शिंदे यांना तालुक्यात आणायचे हे अगोदरच ठरले होते.स्पर्धा काही नाही त्यांनी खुप निधी दिला त्यामुळे सत्कार करायचे आहे हे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...