आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जिल्हा नियोजन समितीचा वार्षिक आराखडा २०२१-२२मध्ये ३६५ कोटी रुपयांचा होता. मात्र, तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ३६५ कोटींचा आराखडा थेट ५०० कोटींवर नेत सर्वाधिक वाढीव निधी मुख्यमंत्र्यांकडून छत्रपती संभाजीनगरला मिळवला होता. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला रोहयोमंत्री, पालकमंत्री संदिपान भुमरे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि सहकारमंत्री अतुल सावे यांच्या पाने तीन मंत्री मिळाले आहेत. त्यामुळे मागणी केलेले वाढीव २५० कोटी रुपये जिल्ह्याला मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र अर्थसंकल्पात जिल्ह्याला केवळ ६० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मराठवाड्यात जिल्हा नियोजन समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मागण्या केल्या असताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र निधी देताना आखडता हात घेतला आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांत जिल्हा नियोजन समितीमध्ये केवळ १२ ते १५ टक्के एवढीच वाढ झालेली आहे.
तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी वार्षिक आराखडा ५०० कोटी रुपयांपर्यंत वाढवला. ही वाढ तब्बल ३६ टक्के होती. त्यानंतर या वर्षी २०२३-१४ साठी छत्रपती संभाजीनगरचा आराखडा ७५० कोटी रुपयांचा करण्यात आला होता. त्याचा प्रस्ताव अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर विभागीय नियोजन समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता. मात्र, आज अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला केवळ ६० कोटी रुपयांचा वाढीव निधी मिळाला असून हे प्रमाण १२ टक्के इतके आहे. त्यामुळे २५० कोटी रुपयांचा वाढीचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी नाकारत जिल्ह्याला फारशी वाढ दिलेली नाही.
पहिल्यांदाच स्थानिक पालकमंत्री गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्याच्या बाहेरचे पालकमंत्री मिळत होते. आता स्थानिक पालकमंत्री असताना फारसा निधी वाढवून मिळाला नाही. विशेष म्हणजे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी स्वतः आम्ही २५० कोटींचा निधी वाढून मागितला असून, आम्हाला तो मिळेल, असा विश्वास व्यक्त केला होता. जिल्हा २०२३ २०२४ टक्के छत्रपती संभाजीनगर ५०० ५६० १२ जालना २८२ ३२५ १५.२५ बीड ३७० ४१० १०.८१ परभणी २५१ २९० १५.५४ धाराशिव ३०० ३४० १३.३३ लातूर ३०२ ३४० १२.५८ हिंगोली २०० २३५ १७.५० नांदेड ४०० ४४५ ११.२५
सर्वाधिक आमदार छत्रपती संभाजीनगरचे
जिल्ह्यात नऊपैकी कन्नडचे आमदार वगळता आठ आमदार सत्ताधारी आहेत. जिल्ह्यातील संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, रमेश बोरनारे, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार हे सर्व आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. या सर्व आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात वाढीव निधी देण्याची मागणीही केली होती. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी वाढीव निधी मिळेल, अशी होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.