आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछावणी परिषदेच्या हद्दीतील टोलनाके १२ एप्रिल २०२३ च्या रात्रीपासून बंद करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर छावणी परिसरातील पाच टोलनाके आता बंद होणार आहेत. संरक्षण विभागाने ११ एप्रिल २०२३ रोजी यासंबंधीची अधिसूचना जारी केली.छावणी परिसरात वेगवेगळ्या माध्यमातून वाहनांकडून विविध शुल्क वसूल केले जात होते. पथकरात वाहन प्रवेश कर आणि वाहन प्रवेश फी वसूल केली जात होती. वाहन प्रवेश फी २०२२ मध्ये बंद करण्यात आली होती. आता नवीन अधिसूचनेनुसार टॅक्स बंद होणार आहे. छावणी परिषदेचे माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते करणसिंग काकस यांनी हा निर्णय नागरिकांना दिलासा देणारा असल्याचे म्हटले आहे. वाहनधारकांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क वसूल केले जात होते. कंत्राटदारावर कुठलाच वचक राहिला नव्हता. नागरिक आणि वाहनधारक यामुळे त्रस्त झाले होते.
‘दिव्य मराठी’ने मांडल्या होत्या वाहनधारकांच्या व्यथा : ‘दिव्य मराठी’ने छावणी टोलनाक्याविषयी व त्या ठिकाणी होणाऱ्या वाहनधारकांच्या लुटीविषयी बातम्या प्रकाशित करताना टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा, ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क वसुली, वाहनधारकांना होणारा त्रास याविषयी पाठपुरावा केला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.