आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅडमिंटन:मिरखेलकरला महिला दुहेरीचे रौप्यपदक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र वरिष्ठ गट राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबादच्या सोनाली मिरखेलकरने महिला दुहेरीत उपविजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत तिचा थोडक्यात पराभव झाला. बुलडाणा येथे झालेल्या स्पर्धेत उपांत्य लढतीत औरंगाबादची सोनाली मिरखेलकर व पुण्याची जोडीदार स्मृती निकिता जोसेफ जोडीचा अनघा खंडाळीकर व योगीता साळवे यांच्याकडून २१-१४, २१-१७ असा पराभव स्वीकारावा लागला. दीर्घ काळानंतर सोनालीने औरंगाबादला रौप्यपदक मिळवून दिले. तिला प्रशिक्षक हिमांशू गोडबोले यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल औरंगाबाद जिल्हा शटल बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर, सचिव सिद्धार्थ पाटील, जावेद पठाण, गुरमित सिंग यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...