आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौलताबाद पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार:बेपत्ता तरुण तलावात मृतावस्थेत आढळला

दौलताबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रागाच्या भरात घरातून निघून गेलेला तरुण तीन दिवसांनी थेट तलावात मृतावस्थेत आढळल्याचा प्रकार दौलताबाद परिसरात समोर आला. धनंजय संतोष सुडा (२१) असे त्याचे नाव आहे. दौलताबाद किल्ल्यामागील रामपुरी तांडा येथे धनंजय कुटुंबासह राहत होता. ताे वडिलांसोबत शेती करत हाेता. १ एप्रिल रोजी ताे घरातून निघून गेला. त्यानंतर तो परतलाच नाही. राग शांत हाेईल. धनंजय घरी येईल, असे कुटुंबाला वाटले. मात्र, तो न आल्याने २ एप्रिल रोजी कुटुंबाने दौलताबाद पोलिस ठाण्यात त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.