आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षमापनादिनी मार्गदर्शन:चूक होतच असते, पण ती मान्य केली तरच तुम्ही क्षमादानास पात्र

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसांकडून चुका होणे स्वाभाविक आहे. कारण जो काहीतरी कार्य करण्याचा प्रयत्न करतो त्याच्याच हातून चुका होत असतात. एक नव्हे तर शंभर चुका झाल्या तरी चालतील, पण एकच चूक वारंवार करू नका. तसेच आपल्याकडून चूक झाली तर ती मान्य करा तरच तुम्ही क्षमादानास पात्र आहोत, असे मार्गदर्शन राष्ट्रसंत आचार्य पुलकसागरजी महाराज यांनी केले.

श्री खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजाबाजार व सकल जैन समाज यांच्या संयुक्त विद्यमाने हिराचंद कासलीवाल प्रांगणात विश्वैमत्री दिवस व सामूहिक क्षमापणा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते. जैन समाजात पर्यूषण पर्वला विशेष महत्त्व आहे. त्यात क्षमापणादिनी या समाजातील अनेक लोकांनी आपल्याकडून झालेल्या चुकांबद्दल आचार्यांच्या उपस्थितीत क्षमा मागितली.

कार्यक्रमाची सुरुवात आशिष बोथरा यांच्या भक्तिगीताने झाली. यावेळी कुंथुकन्यामंडळ बालाजीनगर यांनी धार्मिक नृत्य सादर केले. प्रास्ताविक विलास साहुजी यांनी केले तर सूत्रसंचालन महावीर पाटणी व प्रकाश अजमेरा यांनी केले. क्षमापनाविषयी मार्गदर्शन करताना पुलकसागर महाराज म्हणाले, ‘तुमच्या मनावर जोपर्यंत क्रोध, माया, लोभ व भ्रमाचे ओझे आहे तोपर्यंत पवित्र व निर्मल भावना तुम्हाला स्पर्श करणार नाही. आज विश्वमैत्री व क्षमापणा दिवस आहे. तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत नाही, ज्यांच्याशी तुम्ही संभाषण बंद केले आहे, त्या व्यक्तीची आज क्षमा मागून प्रथम बोलायला सुरुवात करा, तरच खऱ्या अर्थाने विश्वमैत्री दिवस व क्षमापना दिवस सार्थक ठरेल. आईवडील आम्हाला जन्म देतात पण गुरू आम्हाला जीवन देतात. गुरूंची सेवा सर्वात मोठी, गुरुप्रति निष्ठावान राहा,’ असा संदेश त्यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...