आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र मुस्लिम आवामी कमिटीतर्फे शुक्रवारी शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुस्लिमबहुल भागात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर गुलमंडी, औरंगपुरा, गजानन मंदिर, टीव्ही सेंटर आदी भागातील व्यवहार, दुकाने सुरू हाेती.
शहराच्या नामांतराविरोधात विविध संघटनांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महाराष्ट्र मुस्लिम आवामी कमिटीने बंद पुकारला हाेता. शुक्रवारी सकाळपासूनच सेंट्रल नाका, संजयनगर, बायजीपुरा, रोशन गेट, किराडपुरा, लोटाकारंजा, चंपा चौक, शहागंज, पैठण गेट, सिटी चौक आदी भागांमध्ये व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली, तर हिंदूबहुल भाग म्हणून ओळख असलेल्या हडको, सिडको, गजानन मंदिरसह मुख्य बाजारपेठ गुलमंडी, औरंगपुरा आदी भागांमध्ये व्यावसायिक प्रतिष्ठान नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होती. बंददरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
शांततेत बंद पाळल्याबद्दल शहरवासीयांचे आभार आम्ही नामांतराच्या विरोधात पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. आमचा छत्रपती संभाजी महाराजांना विरोध नसून शहराच्या नामांतराला विरोध आहे. त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने बंद पुकारला होता. यात सहभागी झालेल्या शहरवासीयांचे अाम्ही आभारी आहोत. - इलियास किरमानी, अध्यक्ष, मुस्लिम आवामी कमिटी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.