आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबादास दानवेंचे शिंदे गटावर टीकास्त्र:म्हणाले- खंडोची खोपडा, सूर्याजी पिसाळ्याच्या औलादींनी आम्हाला निष्ठा शिकवू नये

कन्नड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कन्नड येथे नागरी सत्काराच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेत्यांनी साधला शिंदे सेनेच्या आमदावर नाव न घेता साधला निशाणा.

55 पैकी 40 लोकांनी गद्दारी केली आणि ते म्हणतात की, आम्ही उठाव केला. उठाव तर मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू यांनी केला होता. उठावाचा अर्थ तरी यांना कळतो का? जा पक्षाने सहा सहा वेळेस आमदारीची तिकिटे कँबिनेट मंत्रिपद दिले. अशी लोक सांगतात आम्ही उठाव केला म्हणून या 40 लोकांनी गद्दारीचा टिळाच कपाळी लावून घेतला आहे, असे म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. कन्नड येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, निष्ठा काय असते हे तान्हाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजीची, येसाजी कंक यांच्याकडून शिकाव खंडोची खोपड्याच्या आणि सूर्याजी पिसाळ्याची औलादी आम्हाला निष्ठा शिकू नये अशी घणाघाती टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे सेनेत गेलेल्या आमदारांवर नाव घेता शनिवारी केली. कन्नड येथील शिक्षक पतसंस्थेत विधानपरिषदचे विरोधीपक्ष अंबादास दानवे यांचा नागरी सत्काराच्या आयोजित कार्यक्रमात अशी घणाघाती टीका केली.

म्हणून निवडणुका लांबवताय

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, ज्यांनी तुम्हाला ओळख दिली ज्यांनी तुम्हाला नाव दिले अशा पक्षाला मैदान मिळू नये. यासाठी तुम्ही हायकोर्टात जाता. म्हणून अशा गद्दारीच्या औलादीचा नायनाट करण्याची आता खऱ्या अर्थाने गरज आहे. 40 जणांना हे पंधरा पुरून उरतील. येणाऱ्या काळात महाराष्ट्र पुन्हा एकदा क्रांती होईल आणि 15 चे 115 झाल्याशिवाय राहणार नाही. हे सरकार आपल्याला घाबरते आहे म्हणून ते निवडणुका लाबंवताय.

काही देणे-घेणे नाही

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, तीन महिन्यात नुसत्या मराठवाड्यात 350 शेतकरी आत्महत्या झाल्या. तरुणांना रोजगार देणारा वेंदात सारखा प्रकल्प गुजरात नेला जातो तरी सुध्दा या सरकारला काही एक घेणेदेणे नाही. दिल्लीची चाकरी करणारे हे सरकार आहे. कोण काय बोलतो, कोण रिव्हॉल्व्हर ने गोळ्या झाडतात कोणी अधिकाऱ्यांना मारतो हे लोक महाराष्ट्राला पुढे नेणार नाही. यांना संपवायला तुमची माझी गरज नाही यांना भारतीय जनता पार्टीच संपवणार आहे. जे-जे लोकं आपल्या जिल्हातून गेलेले आहेत त्यांनी नमक हरामी केली आहे. ज्या संघटनेच्या बळावर तुम्ही मोठे झाले आहेत. तुम्ही आज जे काही आहात ते संघटनेमुळेच आहात. एखादी गोष्ट कमी होईल पण संघटनेशी निष्ठा अतिशय महत्त्वाची आहे.

आदींची उपस्थिती

यावेळी आमदार उदयसिंह राजपुत यांचे भाषण झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, बाबासाहेब मोहिते, सुनील पवार, शहर संघटक उज्ज्वला बिरारीस, रुपाली मोहिते, हर्षाला मुठ्ठे, तालुका अध्यक्ष संजय मोटे, युवा सेनेचे तालुका योगेश पवार, उपाध्यक्ष भारत मिसाळ, गोरख बोर्डे, शिवाजी थेटे, रविंद्र निकम, रमेश वारे, सतिष जिवरख आदीसह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

बातम्या आणखी आहेत...