आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • MLA Ambadas Danve Critizsize Raj Thakeray To Muslim Masjid Specker Statment | Photo Of Raj Thackeray In Muslim Attire Shared On Social Media By Ambadas Danve

भोंग्यांचे राजकारण:राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतला फोटो अंबादास दानवेंकडून सोशल मीडियावर शेअर; म्हणाले- जात, धर्म, प्रांत भेद करण्याची ही वेळ नाही

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी मनसेच्या गुडी पाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वादग्रस्त विधान केले. मशिदीवरील भोंगे खाली उतरवा अन्यथा आम्ही, डबल आवाजात मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू. असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे. त्यावरुन राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी थेट राज ठाकरे यांचा मुस्लिम वेशभुषेतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शनिवारी मुंबईत मनसेचे गुडी पाडवा मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यासह मशिदीवरील भोंगेवर भाष्य केले होते. त्यावरुन आता राजकारण तापले असून, राजकीय नेते राज ठाकरे यांना धारेवर धरत आहेत.

अंबादास दानवे यांनी फोटो पोस्ट

शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी थेट राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतला फोटो फेसबूकवर पोस्ट केला आहे. तसेच त्यासोबत भली मोठी पोस्ट लिहिली आहे. त्यातून त्यांनी राज ठाकरेंवर खरपूस टीका केली आहे. लोकांच्या समस्यांबाबत न बोलता राज ठाकरेंनी धर्मावर बोलून धार्मिक तेढ वाढवल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.

दानवेंच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

अंबादास दानवे यांनी फेसबूकवर एक पोस्ट करत लिहिले आहे की, कोरोना नंतरच्या काळात आज जनतेच्या पोटावर पोटतिडकीने बोलेल आणि त्यानुसार कृती करेल तो खरा लोकनेता….आज जात, धर्म, प्रांत भेद करण्याची ही वेळ नाही. लोकांची रोजी रोटी हिसकावून घेतली गेली आहे. व्यवसाय बुडाले आहे, नोकऱ्या जाऊन बेकारी वाढली आहे. महागाईचा आगडोंब भडकला आहे. केंद्राच्या दिवसेंदिवस दैनंदिन वस्तूच्या वाढत्या महागाईमुळे गोर गरिबांचा संसार विस्कटला आहे. यावर बोलायचे सोडून धार्मिक अराजक कसे माजेल यावर ते बोलले. शिवतीर्थावर झालेल्या गुढी पाडवा स्नेह संमेलनात स्नेह वाढण्या ऐवजी जाती धर्मात द्वेष वाढवण्याचे काम मनसेप्रमुखांनी केले आहे. ह्या त्यांच्या भाषणातून मनसैनिकाना आज काय मिळाले असेल ते केवळ नैराश्य आणि काळजी….राज ठाकरे यांनी केंद्राच्या लोकशाही विरुद्ध धोरणावर आसूड ओढले असते तर आपल्या कार्यकर्त्या कडून टाळ्यांचा कडकडाट झालेला बघायला मिळाला असता पण तसे दिसले नाही. आणि शेवटी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रचंड दूरदृष्टी असलेले नेते होते. याची जाणीव आज सबंध महाराष्ट्राला होतेय. अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे पार पडला. यावेळी राज ठाकरे बोलत आहेत. ते म्हणाले की, "माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. तुम्ही ईडी, इन्कम टॅक्सना धाडी टाकताय ना, पोलिसांना विचारा. झोपडपट्ट्यातल्या मदरशांवर धाडी टाका. काय काय हाती लागेल. प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील. "ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर दुप्पट आवाजात स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांत दिसतात का?" असे राज ठाकरे म्हणाले होते.

पहिल्यांदा तुमचा मुलगा अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावा

राज ठाकरे यांच्या याच वक्तव्याला सुजात आंबेडकर यांनी भाष्य करत राज ठाकरेंवर टीका केली आहे. "पहिल्यांदा तुमचा मुलगा अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावा, आमच्या बहुजन पोरांना नको, असे म्हणत तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लिम दंगलीवर उभा करु नका", अशी विनंतीही सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंना केली.

बातम्या आणखी आहेत...