आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडावृत्‍त:आ. दानवे, राठाेड, पायगव्हाणे राज्य कबड्डी संघटनेवर

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई मंत्रालय येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत संघटनेवर निमंत्रित सदस्य म्हणून मराठवाड्यातील ६ जणांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये स्वीकृत सदस्य म्हणून विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांची तर निमंत्रित सदस्य म्हणून औरंगाबादचे डॉ. माणिक राठोड, हिंगोलीचे डॉ. नवनाथ लोखंडे, परभणीचे डॉ. माधव शेजूळ, लातूरचे शंकर बुड्ढे, जालन्याच्या मनीषा पायगव्हाणे-काटकर यांची राज्य कार्यकारिणीवर निवड करण्यात आली. राज्य कबड्डी संघटनेचे सहकार्यवाह आस्वाद पाटील यांनी नूतन सदस्यांना नियुक्तिपत्र दिले.

‘कबड्डी खेळाचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी मी सदैव तत्पर व प्रयत्नशील राहील, अशी प्रतिक्रिया नूतन सदस्य आमदार अंबादास दानवे यांनी दिली.’

बातम्या आणखी आहेत...