आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमदार प्रदीप जैस्वाल यांचे बंधू अशोक शिवनारायण जैस्वाल (६७, रा. रंगारगल्ली) यांना जमीन विक्री व्यवहारात ११ जणांनी दहा कोटी रुपयांना फसवले. १ फेब्रुवारी ते ४ मार्चपर्यंत घडलेल्या प्रकरणात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैस्वाल यांनी नारेगाव येथील गट क्रमांक २४ मध्ये ४ एकर शेती पैशांची गरज असल्याने विक्रीला काढली. आरोपी अनिल एकनाथ डायगव्हाणे आणि रिता अनिल डायगव्हाणे (दोघेही रा. एमआयडीसी चिकलठाणा) यांनी त्यासाठी तयारी दाखवली. काही आर्थिक व्यवहारही केला. परंतु व्यवहार अपूर्ण असतानाच डायगव्हाणे दांपत्याने कागदपत्रांमध्ये फेरफार केला. जैस्वाल यांना कराराप्रमाणे पूर्ण पैसे दिले नाही. जहीर गफूर कुरेशी (रा. समतानगर), सय्यद सलिमोद्दीन सय्यद नईमोद्दीन, सईब खान अयाज खान, शेख नवीस शेख रहीम, मुक्तार मेहमूद खान ( चौघेही रा. कटकट गेट), अन्सारी मुनव्वर अली सादात अली (रा. टाइम्स कॉलनी), रईस नवाब खान (रा. रहमानिया कॉलनी), शेख जाकेर शेख नसीर (रा. किराडपुरा), फैसल अली बारशेद (रा. इंदिरानगर, बायजीपुरा) यांच्याशी संगनमत करून जमीन विक्री केली. उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.