आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमदाराची पोलिसांसोबत हुज्जत:संचारबंदीत कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाला अडवल्यावरुन आमदार प्रशांत बंब आणि पोलिसांमध्ये वाद

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'ब्रेक द चेन' नुसार कठोर निर्बंध राज्यभरात लादले आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे येत्या पंधरा दिवसांसाठी 'ब्रेक द चेन' नुसार निर्बंध लादण्यात आले आहेत. यानंतर राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. औरंगाबादेतही जागोजागी रस्त्यावर पोलिस उभे आहेत. यामध्ये आता भाजप आमदाराची दादागिरी पाहायला मिळाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या नातेवाईकाला अडवल्यामुळे पोलिसांना दमबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिस हे अडवत असल्याचे दिसत आहे. दरम्यान औरंगपुऱ्यातील महत्माफुले चौकात पोलिसांनी एका तरुणाला अडवले. त्याने पोलिसांना सांगितले की, तो कोविड सेंटरमध्ये असलेल्या रुग्णाला चहा बिस्किट घेण्यासाठी जात आहे. कोविड सेंटरमध्ये नातेवाईकांना जाऊ दिले जात नसल्याने पोलिसांना शंका आली. त्यांनी त्याच्यावर 188 नुसार कारवाई करुन सोडून दिले. मात्र तरीही तो गेला नाही. त्याने आमदार प्रशांत बंब यांना बोलावून घेतले.

यानंतर प्रशांत बंब यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. त्याला का अडवले असा सवाल त्यांनी विचारला. तसेच तो कोरोना रुग्णांचा नातेवाईक आहे. तो दवाखान्यात गेला असल्याचे ते पोलिसांना सांगू लागले. तुम्ही अशा लोकांना अडवू शकत नाही असा दमही प्रशांत बंब यांनी पोलिसांना भरला. मात्र तरीही पोलिसांनी त्याच्यावर शंका आल्यामुळे कारवाई केली असल्याचे सांगितले. यानंतर प्रशांत बंब यांनी आरेरावी करण्यास सुरुवात केली. यावेळी उपनिरीक्षक संदिप शिंदे, पोलिस अमलदार योगेश नाईक, ज्योती किर्ती शाही, वाहतुक शाखेचे कैलास पुसे, रमेश वाघ हे या ठिकाणी होते.

दरम्यान राज्यभरातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढत होत असल्याचे दिसत आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'ब्रेक द चेन' नुसार कठोर निर्बंध राज्यभरात लादले आहे. तरीही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात नागरिक उतरत असल्याचे दिसत आहे. औरंगाबादेतही थोड्या फार प्रमाणात लोक रस्त्यावर येत-जात असल्याचे दिसत आहे. यावेळी पोलिसांकडून त्यांना अडवून समज देत कारवाई करुन सोडून दिले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...