आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार प्रा. रमेश बोरनारे यांचा पुढाकार:जागेचा मोबदला, शेतकऱ्यांना दिले 60 लाख

वैजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्गावरील जागेसाठी मोबदल्यापोटी बोरदहेगाव येथील शेतकऱ्यांना ६० लाख रुपये देण्यात आले. आमदार रमेश बोरनारेंच्या हस्ते धनादेश देण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ आय मार्गातील बोरदहेगाव (ता. वैजापूर) येथे शेतकऱ्यांच्या मालकीची दीड एकर जमीन भूसंपादन प्रश्न दोन दशकापासून प्रशासकीय पातळीवर प्रलंबित होता. शेतकऱ्यांना मोबदला कोणत्या विभागाने मंजूर करण्याचा पर्याय मिळत नसल्याने मागील दोन वर्षांपासून विषय तीव्र स्वरुपात चिघळला होता. गोदावरी नदीपात्रातील पुलावर वाटचालीसाठी चांदेगावच्या शेतकऱ्यांना जमीन भूसंपादन मावेजा अदा करण्याचा प्रश्न पडून होता. शेतकऱ्यांनी काम बंद पाडून कुटुंबासह नदीपात्रात सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.

राष्ट्रीय महामार्गातील शेतकरी रस्त्यावर पाणी सोडून देत असल्याने वाहतूक अनेकदा कोलमडून पडण्याचा फटका वाहनधारकांना सोसावा लागत होता. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता एस. बी. काकड यांनी सांगितले की, आता दीड एकर क्षेत्रात महामार्ग रुंदीकरणासाठी १८ मीटर रुंद आणि ३४० मीटरचे रखडलेले डांबरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जाईल. वर्षभरात हे काम पूर्ण झाल्यास हजारो लोकांचा प्रवास सुखकारक होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...