आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान:आमदार संतोष बांगर यांनी शेतातूनच साधला कृषीमंत्र्यांशी संपर्क, पंचनामे करण्याचे आदेश देण्याची केली मागणी

हिंगोली4 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • एकही शेतकरी वंचित राहू नये - आमदार बांगर

हिंगोली जिल्हयात अतिवृष्टीच्या पावसामुळे सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले. शेतात पाहणी करताना असलेली परिस्थिती पाहून आमदार संतोष बांगर यांनी आज दुपारी शेतातून थेट राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्याशी संपर्क साधून पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी केली. हिंगोली जिल्हयात सध्या सोयाबीन काढणीच्या अवस्थेत आहे, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून त्याचे ढिग करून ठेवले आहेत. मात्र मागील तीन ते चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

विशेष म्हणजे रविवारी ता. 26 सायंकाळी जिल्हाभरात वादळी वाऱ्यासह धुवाधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतात गुडघ्या एवढे पाणी साचले आहे. तर सततच्या पाण्यात असलेल्या सोयाबीनला कोंबे फुटली आहेत. दरम्यान, आज सकाळी आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील काही गावात भेटी देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी हिवरा शिवारात प्रत्यक्ष शेतात जाऊन पिक नुकसानीची माहिती घेतली. यावेळी गुडघा एवढ्या पाण्यात पिके असल्याचे पाहून आमदार बांगर यांनी थेट कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला.

अतिवृष्टीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनला असे कोंब फुटले.
अतिवृष्टीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनला असे कोंब फुटले.

हिंगोली जिल्हयात पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. जिल्हयात तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत अशी विनंती त्यांनी केली. मागील अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यामध्ये औढा नागनाथ तालुक्यात नुकसान निरंक दाखविल्याचे ही त्यांना सांगितले. त्यावर मंत्री भुसे यांनी सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होतील याची ग्वाही दिली. यावेळी सभापती फकीरराव मुंडे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम, राजू पाटील कऱ्हाळे, जसवंत काळे, बाबुराव सावळे, संजय लोंढे, लखन शिंदे, बालासाहेब पोले, शंकर यादव, शिवाजी टोम्पे यांची उपस्थिती होती.

एकही शेतकरी वंचित राहू नये - आमदार बांगर
यावेळी आमदार बांगर यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी. एस. कच्छवे यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला. जिल्हयात पिकनुकसानीच्या पंचनाम्या पासून एकही शेतकरी वंचित राहू नये याची काळजी घेण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...