आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेलपाटा:आमदार शिरसाटांना 24 तासांत 700 किमीचा हेलपाटा, मुख्यमंत्र्यांवर नाराजीच्या बातम्यांनी धास्तावले

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिप्रसिद्धीच्या फटक्याचा अनुभव आमदार संजय शिरसाट यांना आला. २४ तासांत त्यांना ७०० किलोमीटर प्रवासाचा हेलपाटा करावा लागला. मुख्यमंत्र्यांवर नाराजीच्या बातम्यांनी धास्तावून त्यांनी मुंबईचा रस्ता पकडला.

झाले असे की, मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनावर शिरसाटांचा बहिष्कार, अशा बातम्या मंगळवारी सकाळीच चॅनलवर सुरू झाल्या. यासंदर्भात शिरसाट यांच्याशी दिव्य मराठी प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले की, अति प्रसिद्धी घातक असते याचा अनुभव घेत आहे. त्या चॅनलने किमान माझ्याशी बोलायला हवे होते. वस्तुस्थिती अशी की, सोमवारीच मी वर्षा बंगल्यावर गणेश दर्शन घेतले. महालक्ष्मी सणानंतर मराठवाड्यात गणपती देखावे, आरत्या मोठ्या प्रमाणात सुरू होतात. म्हणून स्नेहभोजनासाठी थांबण्याऐवजी मला मतदारसंघात जाऊ द्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. ती त्यांनी मान्य केल्यामुळेच मंगळवारी सकाळी घरी पोहोचलो. आणि या बातम्या पाहून चक्रावलो. आता मीडियाकडे खुलासे करण्यापेक्षा ३५० किलोमीटर जाण्याचा आणि ३५० किलोमीटर येण्याचा प्रवास करावाच लागेल.

बातम्या आणखी आहेत...