आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरिभाऊ राठोड यांचा भारत राष्ट्र समितीमध्ये‎ प्रवेश:आमदार सोळंके यांनी‎ घेतली राव यांची भेट‎

छत्रपती संभाजीनगर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील माजलगाव‎ येथील आमदार प्रकाश सोळंके यांनी शनिवारी‎ भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष, तेलंगणाचे‎ मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची हैदराबाद‎ येथे भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये‎ बराच वेळ चर्चा झाली. दरम्यान, माजी‎ खासदार व आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष‎ हरिभाऊ राठोड यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये‎ प्रवेश केला आहे.‎ तेलंगणामधील शेतकरी संपन्न आहेत.‎ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनादेखील‎ तेलंगणासारखे सुखी व समाधानाचे जीवन‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जगता आले तर खूप बरे होईल, अशी‎ प्रतिक्रिया आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली.‎ या वेळी आमदार बालका सुमन, भारत राष्ट्र‎ समितीच्या किसान सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष‎ माणिकराव कदम यांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...