आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत शिक्षक सन्मान रॅली:शिक्षकांचा आरोप- आमदारांचा बोलवता धनी वेगळा; माझ्यावर तसे संस्कार नाहीत - बंब

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरातील शिक्षकांनी रविवारी सकाळी १२.३० वाजता आमखास मैदानातून विभागीय आयुक्त कार्यालयावर शिक्षक सन्मान रॅली काढली. याचे नेतृत्व शिक्षक आमदार कपिल पाटील, विक्रम काळे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, डॉ. सुधीर तांबे यांनी केले. आमदार व शिक्षकांनी प्रशांत बंब यांना प्रश्न विचारले. त्याच्या अवघ्या दोन तासांत बंब यांनी पत्रपरिषदेतून उत्तरे दिली.

कुठे राहतो? असे विचारले तर सांगा... गावातच राहतो
शिक्षक कुठे राहतात? याच मुद्द्यावरून हा सगळा वाद सुरू आहे. शिक्षक आमदार विक्रम काळे म्हणाले, शिक्षकांना कोणी विचारले, ‘तुम्ही कोठे राहता?’ तर आम्ही गावात राहतो असे सांगा. सरपंच, पालक, नागरिकांना विनम्रतेने बोला. सन्माने वागणूक द्या. सरपंच आपले मायबाप आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता महत्त्वाची आहे. ते कुठे राहतात हे महत्त्वाचे नाही. शिक्षक शिकवतात म्हणूनच ग्रामीण भागातील मुले हुशार आहेत. राज्यभरातील ७५ हजार खासगी शाळेतील विद्यार्थी हे सरकारी शाळेत आले आहेत. स्पर्धा परीक्षांचा आढावा घेतला तर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यात उत्तीर्ण झाल्याचे लक्षात येईल. शिक्षकांना विनाकारण बदनाम करू नका.

रॅलीत सहभागी संघटना

शिक्षक भारती, शिक्षक सेना, अखिल भारतील उर्दू शिक्षक संघटना, राष्ट्रवादी शिक्षक संघ, दिव्यांग कर्मचारी संघटना, मुप्टा - प्रहार शिक्षक संघटना, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र शिक्षक संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी रॅलीत सहभाग घेतला. याशिवाय गंगापूर, वैजापूर, खुलताबाद या गावांतील काही सरपंचानीदेखील आवर्जून हजेरी लावली हे विशेष.

पावसात दीड किमी चालले

रविवारी दुपारी १२.३० वाजता शिक्षकांच्या सन्मान रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र दीड किलोमीटरचे अंतर शिक्षकांनी भिजतच पार केले. विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील मैदानावर सभा झाली. ती सभादेखील भरपावसात झाली. पावसाच्या सभेने परिवर्तन, मोठा बदल घडून येतो, असा अनुभव आहे. आत आमच्या सन्मानासह नवे परिवर्तन होईल, असे रॅलीतील शिक्षकांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...