आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदाराला कोरोना:विधान परिषद सदस्य बाबा जानी दुर्रानी यांना कोरोनाची लागण, औरंगाबादेतील खासगी रुग्णालयात सुरू आहेत उपचार

परभणी2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दुर्रानी यांनी स्वतः फेसबूकवरून दिली

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच विधान परिषद सदस्य बाबा जानी दुर्रानी यांनी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावरून शनिवारी यासंदर्भातील माहिती लोकांना दिली. काही दिवसांपूर्वी ताप आणि सर्दी झाली होती. यानंतर कोरोनाची टेस्ट घेतली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तेव्हापासूनच आपल्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारीच त्यांची अँटिजेन चाचणी घेतली होती. त्यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते.

बाबा जानी यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिले...

प्रिय सहकाऱ्यांनो,सर्दी, ताप असल्या कारणाने मी कोविड-१९ची टेस्ट केली असता कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे कळले. औरंगाबाद येथील रुग्णालयात मी उपचार घेत आहे, आता माझी प्रकृती एकदम स्थिर असून कोणीही काळजी करू नये. आपल्या सर्वांचे असंख्य आशीर्वाद व सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत, त्या जोरावर लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन परत येईल.

तुम्हा सर्वांचं प्रेम आहे, त्याबद्दल मी ऋणी आहे परंतु कोणीही मला संपर्क करण्याचा व भेटण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती. तुम्ही सर्वजण आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, विनाकारण घराबाहेर पडू नका आणि प्रशासनास सहकार्य करा.

उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे आणि अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. ते सगळेच पूर्णपणे बरे झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...