आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजीनगर भुयारी मार्गाविषयी मनसेचा सवाल /:38 कोटींसाठी 27 वर्षे लोकांचे हाल कशाला?

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे मंत्रालयात ताळमेळ नसल्याने शिवाजीनगर येथे भुयारी मार्ग गेल्या २७ वर्षांपासून रखडला आहे. केवळ ३८ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मिळत नाही, म्हणून दररोज हजारो लोकांच्या नशिबी शिवाजीनगर रेल्वे फाटकावर हालअपेष्टा कशाला, असा सवाल मनसेने केला आहे.

खंडपीठाने वारंवार निर्देश देऊनही भुयारी मार्गाचे काम तसुभरही पुढे सरकलेले नाही. येथे बीड बायपासवरून ये-जा करणाऱ्यांची प्रचंड कोंडी होते. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. केंद्र, राज्य सरकारकडून ३८ कोटींच्या निधीचे फक्त गाजर दाखवण्यात येत आहे, असा आरोप करत आंदोलकांनी हातात गाजरे घेतली होती. लोकांचे हाल आणि त्याकडे सरकारचे दुर्लक्ष सांगण्यासाठी एका वासुदेवाला निमंत्रित करण्यात आले होते. त्यानेही नाच करत सद्यस्थिती वर्णन केली. ‘या सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय’ अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी राजीव जावळीकर, लीला राजपूत, अनिकेत निलावार, अण्णा मगरे, प्रशांत जोशी आदींचा आंदोलनात सहभाग होता.

बातम्या आणखी आहेत...