आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबर वादावर मनसेचा इशारा:राज ठाकरेंनी आदेश दिला तर याकूब मेमनची कबर उद्ध्वस्त करू, वेळ पडल्यास दगडं सुद्धा काढून फेकू

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरेंनी आदेश दिला तर याकूब मेमनची कबर उद्ध्वस्त करू, असा इशारा मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी दिला आहे. वेळ पडली तर हिंदूंना कबरीचे दगडं सुद्धा काढून फेकण्याची तयारी करावी लागेल, असेही ते म्हणाले.

राज्यभरात गाजत असलेल्या याकूब मेमन कबर प्रकरणावर विविध स्तरातून प्रतिक्रीया उमटत आहे. आता मनसेनेही या वादात उडी घेतली आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन म्हणाले, ही अतिशय धक्कादायक बातमी आहे. गुन्हेगाराचे उदात्तीकरण होत असताना सर्वजण गप्प होते. ज्या माणसामुळे पावणेतीनशे लोकांनी जीव गमावला. कित्येक अपंग झाले. अशा माणसाची कबर उभारणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हे रोखायला हवे होते.

काही दिवसांनी लोक विसरले

महाजन पुढे म्हणाले, मेमनचे अंत्यसंस्कार अशा ठिकाणी करायला हवे होते, जिथे इतरांना त्याच्यापासून प्रेरणा घेता येऊ नये. मात्र त्याचा जनाजा मोठ्या थाटात निघाला. त्यावेळच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले. पुढे दफनविधीही झाला आणि काही दिवसांनी लोक विसरूनही गेले.

अतिशय क्लेशदायक

प्रकाश महाजन म्हणाले, हळूहळू याकूब मेमनचे उदात्तीकरण व्हायला सुरुवात झाली. नशीब म्हणजे की लवकर लक्षात आले, नाहीतर काही दिवसांनी तेथे उरुसही भरला असता. हिंदु म्हणून हे अतिशय क्लेशदायक आहे. याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. वेळ पडली तर हिंदूंना कबरीचे दगडं सुद्धा काढून फेकण्याची तयारी करावी लागेल. तेव्हाच हा आतंकवाद थांबवता येईल.

भाजप-शिवसेनेने बोलू नये

भाजपने सेनेवर टीका करावी आणि सेनेने भाजपवर टीका करावी. मात्र 2015 ला तर हे सर्व एकत्र होते. त्यावेळी हे काय चाललंय, त्यांच्या लक्षात आले नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे महाजन म्हणाले, भाजपला बोलण्याचा काय अधिकार आहे, ज्यांनी नुपूर शर्माशी अंतर ठेवले. त्यांना हिंदूंवर बोलण्याचा काय अधिकार आहे? ज्या दिवशी सत्तेसाठी शिवसेना शरण गेली त्यांनीही तो अधिकार गमावल्याचे ते म्हणाले.

हिंदुत्वापासून शिवसेना दूर

शिवसेनेने तर दसरा मेळावा घेण्याची गरज नाही. कारण हिंदुत्वापासून शिवसेना फार दूर गेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, अशाप्रकारे अतिरेक्यांचे उदात्तीकरण थांबल पाहिजे. सरकार जर ती कबर जमीनदोस्त करणार नसेल तर राज ठाकरे यांची आज्ञा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक तिथे जाऊन ती कबर उद्ध्वस्त करतील.

बातम्या आणखी आहेत...