आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल हिसकावला:वकिलाच्या हातातून मोबाइल हिसकावला; पोलिसांनी पाठलाग करून तत्काळ पकडले

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेस्थानकावर नाश्ता करणाऱ्या अॅड. पवन कल्याणकर यांच्या हातातील मोबाइल चाेरट्याने हिसकावून नेल्याची घटना १३ मे रोजी घडली. वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार कळताच गस्तीवरील पोलिसांच्या मदतीने रोहित ऊर्फ बंटी किशनलाल शर्मी (२७, रा. नागपूर) व त्याचा साथीदार भाऊसाहेब लक्ष्मण गलधर (३०, रा. पैठण) यांना अटक केली. शर्मीवर तब्बल १९ तर गलधरवर पाच गुन्हे दाखल आहेत.

अॅड. पवन व्यकंटराव कल्याणकर व प्रदीप उत्तमराव शिंदे हे कामानिमित्त हायकोर्ट एक्स्प्रेसने परभणीवरून शुक्रवारी औरंगाबादला आले होते. रेल्वस्टेशन परिसरातील हातगाडीवर नाश्ता करत असताना अचानक दोघांनी कल्याणकर यांच्या हातातील मोबाइल हिसकावून पळ काढला.

काही वेळातच तेथे निरीक्षक सचिन सानप पोहोचले. त्यांना हा प्रकार कळताच त्यांनी गस्तीवरील पोलिसांना चोरट्यांचे वर्णन सांगून शोध सुरू केला. तेव्हा रोहित व भाऊसाहेब पोलिसांच्या हाती लागले. सानप यांच्यासह सहायक निरीक्षक अनिल कंकाळ, उपनिरीक्षक कैलास जाधव, सहायक फौजदार मंगेश अभंग, अंमलदार विशाल दांडगे, साहेबराव शिरसे यांनी ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...