आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परिस्थिती बिकट झाली तर ती याेग्य प्रकारे हाताळता यावी, म्हणून मेल्ट्राॅन रुग्णालयात साेमवारी मॉक ड्रिल घेण्यात आली. यात ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन मेनीफोल्ड, ऑक्सिजन पाइपलाइनची तपासणी करण्यात आली. बेडसाइड मॉनिटर्स, व्हेंटिलेटर्स, औषधी, साहित्य यांची उपलब्धता तपासण्यात आली. दवाखान्यात आलेला रुग्ण अवघ्या १ मिनिट ४५ सेकंदांत दाखल होऊ शकतो, असे या मॉक ड्रिलमधून समोर आले.
कोणत्याही प्रसंगास समर्थपणे तोंड देण्यास मनपाचा आरोग्य विभाग सज्ज आहे. रुग्णवाहिकेतून अपघात विभागात भरती करण्यासाठी किती वेळ लागतो याची रंगीत तालीम करण्यात आली. डिसेंबरमध्ये झालेल्या मॉक ड्रिलच्या तुलनेत या वेळी सुधारणा दिसून आली. कमीत कमी म्हणजे १.४५ मिनिटामध्ये रुग्ण भरती करण्यात आला. सिडको एन-११ रुग्णालय, एन-८ रुग्णालय, नेहरूनगर रुग्णालय, ईओसी पदमपुरा येथेही मॉक ड्रिल घेण्यात आली. या वेळी आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. बी. डी. राठोडकर आदींची उपस्थिती हाेती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.