आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा३०० पेक्षा अधिक डिझेल, इलेक्ट्रिक बस पार्किंगची सोय स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत जाधववाडी येथे ३०० पेक्षा अधिक बस पार्किंगची सोय असलेला अत्याधुनिक बस डेपो तयार होत आहे. वर्षअखेरीस तो तयार होईल, अशी शक्यता आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी बसद्वारे चालवल्या जाणाऱ्या माझी स्मार्ट बससेवेला बस डेपोची गरज होती. सध्या मुकुंदवाडीतील एसटीच्या जुन्या डेपोचा वापर होत आहे. मनपा प्रशासक, औरंगाबाद स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या पुढाकारामुळे मनपा अधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीशी चर्चा केली. जाधववाडी भाजी मंडईतील जागा डेपोसाठी मिळवली. स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, प्रकल्प सहयोगी किरण आढे, बस विभागाचे उपव्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड यांनी डेपो प्रकल्पावर काम सुरू केले. आर्किटेक्ट अजय ठाकूर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. असा असेल डेपो २५ कोटी रुपये खर्चून ७ एकर क्षेत्रफळात हा डेपो उभा राहील. यामध्ये डिझेलवर चालणाऱ्या २५०, इलेक्ट्रिकच्या ५० बस उभ्या राहतील. त्यांच्यासाठी ७५० मीटर लांब, ८ फूट उंच काँक्रीटची संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. भिंतीच्या आत डेपोभोवती हरित पट्ट्यासाठी ३ मीटर जागा उपलब्ध असेल. पार्किंगची जमीन एम ४० काँक्रीटची असेल. ४ मेंटेनन्स बे असतील. पूर्णपणे स्वयंचलित वॉशिंग सिस्टिम असेल. १४३५ चौरस मीटर जागेवर कार्यशाळा आणि प्रशासनासाठी तीन मजली (तळमजला अधिक दोन) इमारत बांधली जाणार आहे. त्यात प्रशासकीय कार्यालय, मेकॅनिक, चालक आणि वाहकांसाठी विश्रांती कक्ष आणि मुख्य चालन व्यवस्थापकाचे दालन असेल. ही इमारत ग्रीन बिल्डिंग मानकांवर बांधली जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.