आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दोन वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील अडीचशे अंगणवाड्या स्मार्ट झाल्या आहेत. या अंगणवाड्यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस) कार्यालयाकडून सोलर लायटिंग सिस्टीम, ई-लर्निंगसाठी टि.व्ही., डेस्क, वॉटर प्युरिफायर आदी विविध साहित्य पुरविले जाते. अशी माहिती जि.प. महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली आहे. तर येणाऱ्या काळात आणखी दीडशे अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत.
जिल्ह्यात 3501 अंगणवाड्या
औरंगाबाद जिल्ह्यात 3501 अंगणवाड्या असून, अंगणवाडीतील शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांना पुरक पोषण आहार, आरोग्य तपासणी व उपचार, पूर्व प्राथमिक शिक्षण, लसीकरण आदी सुविधा पुरविल्या जातात. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत स्मार्ट अंगणवाडी उपक्रम राबविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना स्मार्ट कीट
2021-22 या वर्षात जिल्ह्यातील शंभर अंगणवाड्यांची निवड झाली होती, तर 2022-23 साठी दीडशे अंगणवाड्यांची निवड करण्यात आली आहे. या अंगणवाड्यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाकडून स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून दिले जाते. यात सोलर लायटिंग सिस्टीम (सोलन पॅनल, इनव्हर्टर, बॅटरी, छोट्या ट्युब, डीसी फॅन), एज्युकेशनल प्रिटिंग चार्ट, ई-लर्निंगसाठी 32 इंची एलईडी टि.व्ही.,पेन ड्राइव्ह, डेस्क फ्लोअर सिटींग, स्वच्छ भारत किटअंतर्गत लिक्वीड सोप, साबण, वॉटर बॉटल, हात रुमाल, कंगवा, नेलकटर, कात्री, साफसफाईसाठी पावडर, हॅण्डवॉश बेसिन फॅसिलिटी (स्टीलची 35 लिटर क्षमतेची टाकी, बेसिन बाऊल, स्टील स्टॅण्ड) आदी साहित्यांचा पुरवठा केल्या जातो. निवड झालेल्या अंगणवाडीला एकदाच हे साहित्य पुरविले जाते, असे मिरकले यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.