आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोविड लसीचा वाद:माॅडर्नाचा फायझर बायोएनटेकवर न्यायालयात दावा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत सर्वाधिक वापरलेली कोविड-१९ लस बनवणाऱ्या दोन कंपन्या समोरासमोर आहेत. माॅडर्ना या अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनीने १६ ऑगस्टला आणखी एक अमेरिकन कंपनी फायझर आणि तिचा जर्मन भागीदार बायोएनटेक यांच्याविरुद्ध खटला दाखल केला. कंपन्यांनी त्यांच्या लसी बनवण्यासाठी वापरलेल्या मेसेंजर आरएनए तंत्रज्ञानाच्या घटकांवरून वाद आहे. क्युअरव्हॅक या आणखी एका जर्मन फार्मा कंपनीने जुलैमध्ये बायोएनटेकविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली.

महामारीपासून पेटंट उल्लंघनाच्या अफवा पसरत असल्या तरी लस निर्मात्यांनी संकटाच्या वेळी त्यांची सार्वजनिक प्रतिमा राखण्यासाठी खटलेबाजी थांबवली. आता प्रतिष्ठेच्या हानीपेक्षा खरे नुकसान महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षी माॅडर्नाने लसींमधून १.४३ लाख कोटी रुपयांची, तर फायझरने त्यापेक्षा दुप्पट कमाई केली आहे.

मॉडर्नाचा दावा आहे की, फायझर आणि बायोएनटेकने पेटंट केलेल्या रासायनिक बदलाची कॉपी केली आहे. बायोएनटेक म्हणते की, त्याचे काम मूळ आहे. पेटंट उल्लंघनाचे सर्व आरोप त्यांनी फेटाळले. हे प्रकरण दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. एमआरएनए तंत्रज्ञानाच्या विकासाला अनेक दशके लागली. तंत्रज्ञानावर आधारित कोविड लस वेगाने बनवता येऊ शकते, कारण अनेक शास्त्रज्ञांनी आधीच मूलभूत संशोधन केले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा शोधकर्ता म्हणून एकच शास्त्रज्ञ किंवा कंपनीचे नाव देणे अशक्य आहे. अर्बुटस या कॅनडियन औषध कंपनीने लिपिड शेल्सबाबत माॅडर्नावर दावा दाखल केला आहे. क्युअरव्हॅकव्यतिरिक्त अलेले आणि अलनिलम बायोटेक्नॉलॉजी कंपन्या माॅडर्ना आणि फायझर लस तंत्रज्ञानाच्या इतर भागांबाबत खटला भरत आहेत. आणखी काही गुन्हे दाखल होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...