आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एच. एम. देसरडा यांचा पत्रकार परिषदेत आरोप:मोदी सरकार संविधानात्मक रचना मोडीत काढत आहे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोदी सरकार संविधानात्मक रचना मोडीत काढत आहे, असा आरोप अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी पत्रकार परिषदेत केला. राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून सामाजिक-आर्थिक प्रश्न उभे करत आहेत. त्यांची यात्रा केवळ काँग्रेसची नाही. सत्ताधाऱ्यांना परखड सवाल करत जनतेत जनजागृतीचे काम या माध्यमातून होत असल्याचेही ते म्हणाले. ७ सप्टेंबर रोजी यात्रेत सहभागी होऊन राहुल यांच्यासोबत दहा दिवस पायी चाललेले झालेले देसरडा म्हणाले की, मोदी सरकार मूल्यांची प्रतारणा करत आहे. दीर्घकाळ सत्तेत असताना काँग्रेसने जनतेच्या समस्या सोडवल्या नाहीत. ही बाब नजरेआड करता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...