आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण वर्गाचे आयोजन:देवगिरी कॉलेजात मोडी लिपी प्रशिक्षण 20 सप्टेंबरपासून

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवगिरी महाविद्यालय आणि पुराभिलेख संचालनालयात‌र्फे २० ते ३० सप्टेंबरदरम्यान दहादिवसीय मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. मोडी लिपीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ऐतिहासिक दस्तऐवज, शिवकालीन पत्रव्यवहार, पुराणकाळातील ग्रंथ सामग्री, हस्तलिखिते, मोडी लिपीमधील उपलब्ध साधनसामग्रीचे अध्ययन करता येणार आहे. या अभ्यासासाठी मोडी लिपीचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यामुळे पुरातन काळातील लेखनाच्या पद्धतीचे ज्ञान सहजतेने उपलब्ध होऊ शकते. मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग सर्वांसाठी खुला आहे. सहभागी विद्यार्थी, इतिहासकार आणि युवकांना महाराष्ट्र शासनाचे मोडी लिपी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणानंतर मूल्यांकन करून प्रशिक्षणार्थींना पुराभिलेख संचालनालयातर्फें प्रमाणपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना ३००, तर शिक्षकांसाठी ६०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. इच्छुकांनी देवगिरी महाविद्यालयातील मराठी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य अशोक तेजनकर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...