आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजोहो कॉर्पोरेशनचे अध्यक्ष हैदर निजाम म्हणाले, भारतात जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्टअप इकोसिस्टिम आहे. यातून १०० पेक्षा जास्त युनिकॉर्न उदयाला आले. या दौऱ्यात स्टार्टअप इकोसिस्टिमला यूएईच्या बाजारपेठेत जास्त संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर यूएईच्या महत्त्वाकांक्षी आर्थिक योजनेला देखील या भागीदारीतून बळ मिळणार आहे. त्यात विकास, विक्री याबद्दल संधी होतील. उभय देशांत स्टार्टअपशी संबंधित अनेक करार होण्याचीही शक्यता आहे.
आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार भारताची ८४ टक्के पेट्राेलियम मागणी आयातीमधून पूर्ण केली जात हाेती. २३९ दशलक्ष टन पेट्राेलियम आयातीसाठी सुमारे ७७ अब्ज डाॅलर्स माेजावे लागत हाेते. यूएई भारताचा सर्वात तिसरा माेठा व्यापारी भागीदार आहे. यूएईमध्ये ३५ लाख भारतीय नागरिक वास्तव्याला आहेत. पर्शियन खाडीतील देशांची भागीदारी सुमारे ६० टक्के एवढी राहिली.
पंतप्रधान नरेंद्र माेदी २८ जून राेजी यूएईला दाखल हाेतील. सात वर्षांतील त्यांचा हा चाैथा यूएई दाैरा असेल. जर्मनीत आयाेजित जी-७ शिखर संमेलनात सहभागी झाल्यानंतर माेदी यूएईला पाेहाेचतील. त्यांचा हा एकदिवसीय दाैरा असेल. या दाैऱ्यात माेदी शेख खलिफा बिन जायद अल नाहयान यांच्या निधनावर संवेदना व्यक्त करतील. त्याचबराेबर नवीन राष्ट्रपती शेख माेहंमद बिन जायद अल नाहयान यांना ते शुभेच्छा देतील. सीईपीएवर स्वाक्षरीनंतर माेदींचा हा पहिला दाैरा आहे. एक्स्पाेदरम्यान टाळलेल्या भेटीनंतर माेदींच्या या दाैऱ्याकडे व्यापार जगताचे लक्ष लागले आहे. मुक्त व्यापार कराराच्या लाभाबद्दल द्विपक्षीय मंत्रिस्तरीय बैठका व विविध कार्यक्रमांसह माेदी यांचा हा दाैरा उभय देशांतील संबंध जास्त बळकट करणारा ठरेल.यूएईमधील भारतीय उद्याेजकांना माेदींच्या दाैऱ्याची प्रतीक्षा आहे. हा समुदाय त्याबद्दल अतिशय सकारात्मक आहे. उद्याेग क्षेत्राला माेदींच्या दाैऱ्यात अनेक प्रकारच्या संधी दिसून येतात. गल्फ न्यूजचे माजी संपादक बाॅबी नक्वी म्हणाले, हा दाैरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरताे.
मे महिन्यापासून भारत-यूएईमध्ये व्यापक आर्थिक भागीदारी करार करण्यात आले आहेत. दुसरीकडे गल्फ देशांत भाजप नेत्यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी आणि नाराजी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यातून भारत व यूएई संबंध पूर्वपदावर आणण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. एस्टर डीएम हेल्थकेयरचे अध्यक्ष डॉ. आझाद मूपेन म्हणाले, राष्ट्रपती शेख मोहंमद बिन जायद अल नाहयान व मोदी यांच्यात व्यक्तिगत पातळीवर मैत्री आहे. सीईपीएकडून भारत व संयुक्त अरब अमिरातकडून निर्यात मालाच्या एका श्रेणीवरील कर समाप्त करण्यात आला आहे. द्विपक्षीय व्यापार ५०-६० अब्ज अब्ज डॉलरवरून १०० अब्ज डॉलर (सुमारे ७.८ लाख कोटी रुपये) पार करू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.