आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजच्या तरुणांना महात्मा गांधी यांचे विचार सांगण्यासाठी महात्मा गांधी सर्वोदय मंडळामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. सोमवारी सकाळी गांधी पुतळा येथे अभिवादन करून मुलांनी चरखा चालवला. सर्वोदय भवनात ‘मोहन से महात्मा’ या विषयावर आधारित चित्रप्रदर्शन भरवण्यात आले.
पैठण रोडवरील महात्मा गांधी सर्वोदय भवनात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम झाला. सकाळी सराफा बाजारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करण्यात आले. या वेळी ज्ञानप्रकाश मोदाणी, भाई रजनीकांत, जगदीश पुराणिक, योगेश राऊत यांची उपस्थिती होती.
पुतळ्यासमोर महात्मा गांधी यांच्या जीवनावरील तसेच महात्मा गांधी यांची स्वत: लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले. ५० मुलांना सूत कातण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती ज्ञानप्रकाश मोदाणी यांनी दिली. ते म्हणाले, ‘विविध शाळांतील मुले चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी येत असतात. त्यांच्यापर्यंत महात्मा गांधींचे विचार व्याख्यानाच्या माध्यमातून पोहोचवले जातात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.