आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून अपडेट:मान्सूनला एमजेओ, वेस्टर्न डिस्टर्बन्सचा खोडा; हा आठवडा जाणार कोरडाच; राज्यातील आठ जिल्ह्यांत पावसाची तूट

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा केरळात दाखल झाल्यापासून महाराष्ट्रापर्यंत वेगाने प्रगती करणाऱ्या मान्सूनचा वेग उत्तर भारतात दाखल झाल्यापासून मंदावला आहे. मेडेन ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ), पश्चिमी चक्रावात (वेस्टर्न डिस्टर्बन्स), मोसमी वाऱ्यांचा मंद वेग आणि समुद्रात कमी दाबाचा अभाव यामुळे मान्सून सध्या दिल्ली, हरियाणा आणि पंजाब सीमेवर थबकला आहे. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला असून जूनचा शेवटचा आठवडाही कोरडा जाण्याची शक्यता हवामान विभागासह तज्ज्ञांनी वर्तवली आहे. राज्यात आतापर्यंत आठ जिल्ह्यांत पावसाची तूट पडली असून बहुतांश जिल्ह्यांत पेरण्या रखडल्या आहेत.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अहवालानुसार, देशात ३० जूनपर्यंत मान्सूनचा वेग मंदावलेला राहण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनने केरळात निर्धारित वेळेच्या दोन दिवस उशिरा म्हणजे तीन जून रोजी प्रवेश केला. नंतर मात्र वेगाने प्रगती करत निर्धारित वेळेच्या सात दिवस आधीच मान्सूनने पूर्व, मध्य भारत पादाक्रांत करत वायव्य भारतापर्यंत मजल मारली. सध्या बारमेर, भिलवारा, ढोलपूर, अलिगड, मीरत, अंबाला ते अमृतसर अशी नैऋत्य मान्सूनची उत्तरी सीमा आहे. गेल्या सात दिवसांपासून मान्सून याच सीमेवर थबकलेला आहे. मान्सूनसाठी आ‌वश्यक मानली जाणारी व हिंदी महासागरात एमजेओ ही हवामानासंबंधीची दोलायमानता अनुकूल नाही. त्यामुळे राज्यात ३० जूनपर्यंत दमदार पावसाची शक्यता कमी आहे.

राज्यातील आठ जिल्ह्यांत पावसाची तूट
राज्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाला. मात्र १५ जूननंतर जोर ओसरला. सध्या ८ जिल्ह्यांत जूनच्या सरासरीच्या तुलनेत पावसाची तूट पडली.

जिल्हा तूट

  • अ.नगर ०६%
  • धुळे ४०%
  • जळगाव १५ %
  • नंदुरबार ४१%
  • नाशिक ०३ %
  • सोलापूर १७ %
  • अकोला ४८ %
  • बुलडाणा १२ %
बातम्या आणखी आहेत...