आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीने चिठ्ठी लिहून सोडले घर:'मम्मी-पप्पा, मला गरीब परिस्थिती बघवत नाही, खूप लांब जॉबसाठी जात आहे, केस करू नका'

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मम्मी-पप्पा, मी गाव व घर सोडून खूप लांब जॉबसाठी जात आहे. मी माझ्या जबाबदारीवर एकटी जाणार आहे. आपल्या घरची परिस्थिती मी पाहू शकत नाही, असे म्हणत आईवडिलांना उद्देशून भावनिक चिठ्ठी लिहून २२ वर्षीय तरुणी सोमाली अनिल नवगिरी घर सोडून बेपत्ता झाली. आईवडिलांना चिठ्ठी मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ छावणी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला.

महाविद्यालयीन शिक्षण घेणारी सोमाली सध्या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेते. छावणीतील लक्ष्मी कॉलनीत ती आईवडिलांसह राहते. मात्र, घरी आर्थिक परिस्थिती बेताची झाली. सोमालीला नेहमीच घरात हातभार लावण्यासाठी नोकरी करण्याची इच्छा होत होती. मात्र, घरचे नोकरी करू देतील का, असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहायचा. यासाठी वारंवार तिने प्रयत्न केले. त्यातून तणावाखाली येऊन अखेर सोमालीने नोकरीच्या शोधासाठी घर सोडण्याचा निर्णय घेतला. हे समजताच तिच्या आईने छावणी पोलिसांकडे तक्रार दिली. कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पाेलिस या तरूणीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी सहायक फौजदार सुरेश जिरे तपास करीत आहेत.

सोमालीने १५ जून रोजी घर सोडले. मात्र, त्यापूर्वी आईवडिलांना उद्देशून भावनिक आवाहन करणारी चिठ्ठी लिहून सोडली. त्यात म्हटल्यानुसार, मम्मी-पप्पा, मी हे गाव, घर सोडून जॉबसाठी खूप लांब जात आहे. मी माझ्या जबाबदारीवर एकटी जाणार आहे. माझ्यासोबत कोणी नाही. कारण आपल्या घरची परिस्थिती मी बघू शकत नाही. त्यामुळे मी स्वत:च करिअरसाठी आणि घराचं चांगलं व्हावं, त्यासाठी जाणार आहे. कारण हे सगळं आता मी बघू शकत नाही आणि मी जेथे जाईल तेथे खूप चांगली राहील. जे सगळं झाल्यावर तुम्ही कोणावरच केस करायची नाही. मी कोणतंच वाईट काम करायला चालले नाही. मी चांगल्या कामासाठी बाहेर पडत आहे.

बातम्या आणखी आहेत...