आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारपासून शाळांची घंटा वाजणार:विद्यार्थी मित्रांच्या स्वागतासाठी सुंदर शाळा सजवा; जि.प. अधिकाऱ्यांचे आदेश

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन वर्षात शैक्षणिक क्षेत्र खूप विस्कळती झाले होते. परंतु 2022-23 पासून नियमित शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. येत्या सोमवार दि. 13 जून पासून शाळांना सुरुवात होणार आहे. तर 15 जून पासून प्रत्यक्ष विद्यार्थी शाळेत येणार आहेत. यासाठी शाळांनी जंगी तयारी करावी, शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सजवावी आणि पालकांच्या भेटी घ्याव्यात अशा सूचना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के.देशमुख यांनी सर्व शाळांना दिल्या आहेत.

13 जून पासून शाळा सुरू होत असल्याने 13 व 14 जून रोजी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व शाळा स्वच्छता, शाळेचे निर्जंतूकीकरण करणे, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कोविड-19 प्रार्दुभाव तसेच आरोग्य विषयक बाबीच्या अनुषंगाने जनजागृती, समुपदेशन करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

लसीकरणाची माहिती घ्या

दरम्यान कोविड -19 सुरक्षेच्या दृष्टीने सर्व शाळांमध्ये 12 ते 18 वयोगटातील किती विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. याची माहिती शाळांनी घेवून ती शिक्षण विभागास कळवावी अशा सूचनाही शाळांना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थी मित्रांचे जंगी स्वागत

प्रत्यक्ष विद्यार्थी हे 15 जून पासून शाळेत येणार आहेत. त्या अनुषंगाने "शाळा पूर्व तयारी अभियानाची" अंमलबजावणी टप्पा दोन शाळांनी करायचा आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागताची जंगी तयारी करत. मुलांना पहिल्या दिवशी गोड पोषण आहार देण्यात यावा त्याचा नियोजन शाळांनी करावे असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...