आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइन्फ्रा- हाउसिंग
प्रधानमंत्री आवास योजनेचे बजेट ६६% वाढून ७९ हजार कोटींवर
भांडवली गुंतवणूक खर्च ३३% वाढवून १० लाख कोटी केला. तो जीडीपीचा ३.३% आहे. २०१९-२० च्या तुलनेत ३ पट जास्त आहे. सर्वांना घर देण्यासाठी पीएम आवास योजनेेचे बजेट ६६% वाढवून ७९ हजार कोटी केले. आजवर १.२३ कोटी घरे बांधली आहेत.
तात्पर्य: पायाभूत आराखडा-गृहनिर्माणमध्ये प्रभावी गुंतवणुकीमुळे विकास क्षमता व रोजगारनिर्मितीला चालना मिळते. यामुळे सरकारला विपरीत जागतिक परिस्थितींना सामोरे जाणे, रोजगार आणणे आणि खासगी गुंतवणूक वाढवण्यात मदत होईल.
नारीशक्ती
महिला सन्मान योजनेत २ लाख रु. पर्यंत गुंतवणुकीवर ७.५% व्याज
अर्थसंकल्पात ७.५% व्याजाच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्राची घोषणा. महिलांना दोन वर्षांच्या मुदतीसाठी कमाल २ लाखांची रक्कम जमा करता येईल. तीन कोटी शेतकरी महिलांसाठी पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत ५४ हजार कोटींची तरतूद. महिलांचे ८१ लाख बचत गट स्थापन केले जातील.
तात्पर्य : सध्या देशातील ७८% कामगार महिला बचतीच्या मूळ नियमानुसार म्हणजे २०% बचत करत नाहीत. २ लाखांच्या योजनेत दोन वर्षांनंतर ३० हजार रुपयांचा लाभ होईल.
ज्येष्ठ नागरिक
४८ लाख जमा केल्यास दरमहा व्याजातून ३१ हजारांची कमाई
वार्षिक ८% व्याजदराच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची मर्यादा १५ लाखांवरून ३० लाख रुपये होईल. सोबतच, ज्येष्ठांची मासिक उत्पन्न योजना ४.५ लाखांवरून ८ लाख केली आहे. पती-पत्नीही इतकी रक्कम जमा करू शकतात आणि संयुक्त खात्यात १५ लाख जमा करू शकतात. व्याजदर ७.१% आहे.
तात्पर्य: ज्येष्ठ नागरिक योजनेत ३० लाख रुपये जमा केल्यास दरमहा २० हजार रुपयांचे व्याज मिळेल. एमआयएसमध्ये १८ लाख जमा केल्यास दरमहा १०,६५० रुपये मिळतील.
आरोग्य
आरोग्याचे बजेट १३% वाढवले, मेडिकल कॉलेजांत संशोधनास वाव
बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी ८९,१५५ कोटी रुपये दिले आहेत. ते २०२२-२३ च्या तुलनेत १३% जास्त आहेत. खासगी व सरकारी मेडिकल कॉलेजही आयसीएमआरच्या प्रयोगशाळेत संशोधन करू शकतील. वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी १५७ नवी नर्सिंग कॉलेजेस उघडली जातील.
तात्पर्य : आरोग्य क्षेत्रात माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान आणि खासगी-सरकारी भागीदारीला चालना देण्यावर अधिक भर आहे. यामुळे वैश्विक आरोग्य सुविधांची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढेल.
ऑनलाइन गेम
उत्पन्नावर ३०% टीडीएस, मोठ्या विमा मॅच्युरिटीवरही कर लागणार
ऑनलाइन गेमिंगवर कर कपात लागू करण्याची तरतूद. या अंतर्गत कितीही कमाई करा ३०% टीडीएस लागणार. आधी १० हजारपेक्षा जास्त कमाई केल्यास ३०% टीडीएस लागू होता. २०२५ पर्यंत देशात मोबाइल गेमर ६५ कोटी होतील,असा अंदाज आहे.
{१ एप्रिल २०२३ नंतर आपण ५ लाखांपेक्षा अधिक प्रीमियमची विमा पॉलिसी खरेदी केल्यास (यूलिप वगळता ) मॅच्युरिटीवेेळी मिळणाऱ्या लाभावर कर चुकता करावा लागेल. १ एप्रिल २०२३ पूर्वी खरेदी केलेल्या विमा पॉलिसीची मॅच्युरिटी करमुक्त असेल.
परदेशवारी महाग
परदेश प्रवासावर टीसीएस ५ वरून २०%, देशांतर्गत पर्यटनावर भर
लोक परदेश प्रवासावर लाखो रुपये खर्च करतात. परंतु कर मात्र भरत नाहीत, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले होते. आता टूर ऑपरेटर ओव्हरसीज टूर पॅकेजवर ५ टक्क्यांऐवजी २० टक्के टीसीएस घेईल. त्यामुळे परदेश वारी करणाऱ्यांना आपल्या रिटर्नमध्ये परदेश प्रवास नोंदवावा लागेल. रिटर्न अनिवार्य असेल.
{देशात "देखो अपना देश' योजना लाँच केली. ५० ठिकाणे पर्यटनस्थळ म्हणून विकसित केली जातील. याअंतर्गत पर्यटकांना हॉटेल भाडे, प्रवास प्रवेश शुल्कांत सवलत मिळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.