आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:टोकाई कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार ‘लक्ष्मी’, 7000 शेतकऱ्यांना मिळणार एफआरपीची थकीत रक्कम

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या सुमारे ७००० ऊस उत्पादक शेतकऱ्याची एफआरपीची थकीत असलेली २३५ रुपयां मेट्रीक टन या प्रमाणे होणारी रक्कम मंगळवारपर्यंत ता. २५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार अाहे. त्यामुळे ऐन महालक्ष्मी सणाच्या काळातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ‘लक्ष्मी’ जमा होणार आहे.

वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील ११० गावे आहेत. कारखान्याची गाळप क्षमता १२६० मेट्रीक टन दररोज एवढी आहे. मागील वर्षी १ लाख ३४ हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले आहे. त्यातून साखर १ लाख ३९ हजार ४५० मेट्रीक टन साखर उत्पादीत झाली असून उतारा १०.३६ टक्के एवढा आहे.

या कारखान्याला कार्यक्षेत्रातील ७००० शेतकऱ्यांनी ऊस दिला असून या शेतकऱ्यांना शासनाच्या एफआरपी नुसार २२७५ रुपये मेट्रीक टन दर दिला आहे. त्यापैकी २०४० रुपये टन या प्रमाणे ऊसाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. त्यानंतर आता उर्वरीत २३५ रुपये मेट्रीक टनाची रक्कम मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शिवाय ऐन महालक्ष्मी सणाच्या वेळीच सभासदांच्या बँक खात्यात या रकमेच्या रुपाने ‘लक्ष्मी’ जमा होणार आहे.

आगामी हंगामात ३ लाख मेट्रीक टन गाळपाचे उदिष्ट ः ॲड. शिवाजी जाधव, अध्यक्ष टोकाई सहकारी साखर कारखाना
टोकाई कारखान्याने आगामी हंगामात ३ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले आहे. कारखाना कार्यक्षेत्रात सध्या २.५ लाख मेट्रीक टन ऊस असून गेटकेन पध्दतीने ऊसाची खरेदी केली जाईल. कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेला जाईल याचे नियोजन करण्यात आले आहे.